ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करत असतात. ते कधी मित्राच्या राशीत तर कधी शत्रूच्या राशीत प्रवेश करत असतात. अशातच आता गुरू ग्रहाने मेष राशीत गोचर केलं आहे आणि तो वक्री होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे, म्हणजे या राशींना धनलाभ आणि करिअर-व्यवसायात प्रगतीचे योग बनण्याची शक्यता आहे. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
कर्क रास (Cancer Zodiac)
गुरु वक्री होणं कर्क राशीसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण गुरु ग्रह तुमच्या राशीतून कर्माच्या स्थानी वक्री होणार आहे. तसेच, गुरु हा तुमच्या राशीच्या सहाव्या आणि नवव्या स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुमची नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. तसेच कोर्ट-कचेरी प्रकरणांमध्येही तुम्हाला यश मिळू शकते. या काळात तुम्ही तिर्थ यात्रेला जाण्याची शक्यता निर्माण होत आहे. परदेश प्रवास घडण्याचीही दाट शक्यता आहे. तसेच नोकरदारांचे प्रमोशन होऊ शकते.
सिंह रास (Leo Zodiac)
सिंह राशीच्या लोकांसाठी गुरूचे वक्री होणे अनुकूल ठरू शकते. कारण तुमच्या गोचर कुंडलीतील भाग्यशाली स्थानात गुरू वक्री होणार आहे. तसेच, गुरु हा तुमच्या राशीच्या पाचव्या आणि आठव्या स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला मुलाच्या बाजूने काही चांगली बातमी मिळू शकते. जे लोक संशोधन क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला ठरु शकतो. दुसरीकडे, तुमच्याकडून थांबलेली कामे या कालावधीत पूर्ण होऊ शकतात. तसेच तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहू शकते.
वृश्चिक रास (Scorpio Zodiac)
गुरू वक्री होणं वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण गुरु ग्रह तुमच्या राशीच्या पाचव्या स्थानी वक्री होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला प्रेमप्रकरणात यश मिळू शकते. दुसरीकडे, ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. गुरु लग्न आणि चौथ्या स्थानाचा स्वामी आहे, त्यामुळे यावेळी तुम्ही मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. तसेच जे लोक धर्म-कार्य, अध्यात्माशी निगडीत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)