Guru Gochar 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे एक महत्त्व आहे. गुरु बृहस्पतीचे गोचर हे सर्वच राशींसाठी शुभ मानले जाते पण अन्य ग्रहांच्या स्थितीनुसार या ग्रहाच्या प्रभावाने काही राशींना प्रचंड धनलाभ होऊ शकतो. गुरु हा सुख, सौभाग्य,यश , धन, वैभव व बुद्धीचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्या राशीत गुरुची स्थिती मजबूत होईल त्या राशीला सुख- समृद्धी व धनप्राप्ती होण्याची संधी असते असे मानले जाते. ज्योतिष अभ्यासक सांगतात की, २२ एप्रिल २०२३ ला गुरु ग्रह सकाळी ३ वाजून ३३ मिनिटांनी अश्विनी नक्षत्रात प्रथम स्थानी प्रवेश घेणार आहे. या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींना विशेष लाभ होण्याची संधी आहे. या राशी कोणत्या हे पाहूया…

मेष रास (Mesh Rashi)

ज्योतिष शास्त्रानुसार गुरु आपल्या राशीच्या पाचव्या स्थानी स्थिर होणार आहे. या काळात मेष राशीच्या मंडळींच्या कुंडलीत भाग्योदय होऊ शकतो. नशिबाची साथ मिळाल्याने तुमची प्रलंबित कामे मार्गी लागू शकतात. केतूच्या नक्षत्रात गुरूचा प्रवेश झाल्याने वैवाहिक जीवनात संकट येऊ शकते पण तुम्ही जोडीदाराशी नीट संभाषण ठेवल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.

मिथुन रास (Mithun Rashi)

ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन अकराव्या स्थानी गुरु विराजमान होणार आहेत. अशावेळी या राशीच्या मंडळींना नोकरी व व्यवसायात बदलाची संधी आहे. तुम्हाला यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी खूप मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. खूप काळापासून थांबून राहिलेली कामे पूर्ण होऊ शकतात. व कुटुंबाच्या सहकार्याने तुम्ही धनलाभ मिळवू शकता.

धनु रास (Dhanu Rashi)

गुरुचे आश्विनी नक्षत्रातील स्थान हे धनु राशीसाठी शुभ ठरू शकते. नोकरदार मंडळींना पदोन्नतीचा योग आहेत. जर तुम्ही नव्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला लवकरच हवी तशी संधी लाभू शकते. समाजात मान- सन्मान वाढीस लागल्याने कुटुंबाचा तुमच्यावरील विश्वास वृद्धिंगत होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अगदी फायद्याचा ठरू शकतो, परीक्षेत यशाची चिन्हे आहेत.

हे ही वाचा<< २३ एप्रिलपासून शनीदेव ‘या’ राशींच्या कुंडलीला देतील कलाटणी? लक्ष्मी कृपेने होऊ शकता कोट्यवधींचे धनी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मकर रास (Makar Rashi)

गुरुच्या दृष्टीने मकर राशीच्या बाराव्या स्थानी शुभ राजयोग तयार होत आहेत. गुरूच्या आश्विनी नक्षत्रातील प्रवेशापासून तुम्हाला लाभदायक काळ अनुभवता येऊ शकतो. या राशीला पदोन्नतीसह पगारवाढीसाठी सुद्धा संधी आहे. आपल्या कामाच्या ठिकाणी खूप कौतुक होऊ शकते. त्यामुळे आत्मविश्वास वाढून तुम्हाला नव्या कामाचा हुरूप येऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)