Daily Horoscope In Marathi , 15 May 2025 : १५ मे २०२५ रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया आहे. तृतीया तिथी शुक्रवारी ४ वाजून ३ मिनिटांपर्यंत राहील. दुपारी २ वाजून ८ मिनिटांपर्यंत ज्येष्ठा नक्षत्र जागृत होईल. त्यानंतर सकाळी ७ वाजून १४ मिनिटांपर्यंत सिद्ध योग जुळून येईल. राहू काळ १:३० वाजता सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे आज गुरूने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. तर आज गुरूने मिथुन राशीत प्रवेश करताच कोणत्या राशीच्या आयुष्यात कसा पडणार प्रभाव जाणून घेऊया…
१५ मे २०२५ पंचांग व राशिभविष्य (Rashi Bhavishya In Marathi, 15 May 2025)
मेष आजचे राशिभविष्य (Aries Horoscope Today in Marathi)
मानसिक चंचलता जाणवेल. विचारांच्या गर्दीत वाहून जाऊ नका. भावंडांची मदत घेता येईल. जवळच्या ठिकाणी फेरफटका मारून यावा. आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल.
वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Horoscope Today in Marathi)
तुमच्यातील खळखळता उत्साह जागृत ठेवावा. कामाचा ताण जाणवेल. वेळेचे नियोजन केल्यास बर्याच गोष्टी जमून येतील. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव राहील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.
मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Horoscope Today in Marathi)
आपल्याचा शब्दावर ठाम राहाल. दिवस मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. क्षणिक गोष्टींनी खुश व्हाल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागावे. थोडा स्वत:साठी वेळ काढावा.
कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Horoscope Today in Marathi)
मागील गोष्टींची पुनरावृत्ती टाळावी. जोडीदाराच्या वागण्याचे आश्चर्य वाटू शकते. मानसिक अस्थिरता जाणवेल. भावनेच्या अति आहारी जाऊ नका. वैचारिक गोंधळ उडू शकतो.
सिंह आजचे राशिभविष्य (Leo Horoscope Today in Marathi)
नोकरदारांचा मान वाढेल. नवीन स्नेहसंबंध जुळून येतील. जवळच्या लोकांची गाठ पडेल. लहान मुलांशी खेळण्यात रमून जाल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.
कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Horoscope Today in Marathi)
दिवसभर कामाची गडबड राहील. आपली मनस्थिती गोंधळलेली राहू शकते. कामाचे व्यवस्थित मूल्यमापन करावे. एकाच वेळी अनेक कामात हात घालू नये. इतरांना स्वखुशीने मदत कराल.
तूळ आजचे राशिभविष्य (Libra Horoscope Today in Marathi)
चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल. नसत्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. फक्त आपल्याच कामाशी मतलब ठेवून वागावे. कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Horoscope Today in Marathi)
आपण स्वत:च आपल्या त्रासाला कारणीभूत ठरू शकाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. भावंडांना मदत करता येईल. अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणूक करतांना संपूर्ण विचार करावा.
धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today in Marathi)
तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. सारासार विचार करूनच मग कृती करावी. हातापायांच्या किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका. कोणतेही साहस करतांना घाई करू नका. प्रवासात खबरदारी घ्यावी.
मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Horoscope Today in Marathi)
प्रेमातील जवळीक जोपासावी. मुलांशी किरकोळ कारणावरून वाद संभवतात. स्वत:च्या करमणुकीचा मार्ग शोधावा. जुन्या गोष्टींमध्ये फार काळ रेंगाळू नका. अनावश्यक गोष्टींवरील खर्च टाळावा.
कुंभ आजचे राशिभविष्य (Aquarius Horoscope Today in Marathi)
मुलांच्या चंचलतेकडे बारीक लक्ष ठेवावे. रेस, जुगार यांपासून दूर राहावे. आततायीपणे कोणतेही काम करू नये. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. कामाचा ताण वाढू शकतो.
मीन आजचे राशिभविष्य (Pisces Horoscope Today in Marathi)
घरगुती कामात अधिक वेळ जाईल. मित्रमंडळींमध्ये खोडकरपणा कराल. दिवस मजेत घालवाल. हातातील अधिकाराचा वापर करावा. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर