Navpancham Rajyog In Kundali: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात ग्रहांच्या उलाढालींमुळे अनेक शुभ- अशुभ राजयोग तयार होत असतात. जुलै महिन्यात सुद्धा मंगळ व गुरु ग्रहाची युती होऊन नवपंचम राजयोग तयार होत आहे. मंगळाने जुलै महिन्याच्या १ तारखेलाच आपली कनिष्ठ रास कर्क मधून निघून सिंह राशीत प्रवेश घेतला आहे. तर गुरुदेव सुद्धा मेष राशीत भ्रमण करताना सहाव्या क्रमांकाच्या सिंह राशीत सक्रिय आहेत. या युतीने येत्या काही दिवसात नवपंचम राजयोगाचा मंगल प्रभाव कायम असणार आहे. याचा फायदा सर्वच राशींना होणार असला तरी चार अशा भाग्यवान राशी आहेत ज्यांना येत्या काळात कोट्यधीशांप्रमाणे नशिबाची साथ लाभू शकते. धनसंपत्तीसह आरोग्याने सुद्धा समृद्ध होण्याचा या राशींना योग आहे. या राशी कोणत्या हे पाहूया…

नवपंचम राजयोग बनल्याने तुमची रास होणार का समृद्ध?

मेष रास (Aries Zodiac Horoscope)

नवपंचम राजयोग बनून मेष राशीचा लाभदायक काळ सुरु होऊ शकतो. कारण स्वतः गुरुदेव मेष राशीत स्थित आहेत. भाग्येश गुरू लग्नी आहे. राहू जरी सोबत असला तरी गुरू आपल्या उद्योगधंद्यात, नोकरीत मदतीचा ठरेल. गैरसमज, वादविवाद फारसे विकोपाला जाणार नाहीत तर व्ययातील मीनेचा नेपच्यून चतुर्थस्थानावर आपली नवपंचम दृष्टी कायम शुभदायक ठेवील. शिक्षण किंवा कामाच्या निमित्ताने परदेश प्रवास घडू शकतो. सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील असणाऱ्यांना मोठी संधी मिळू शकते. तुम्ही ध्येयाच्या दिशेने तुम्हाला काही पाऊले पुढे नेणारी ही वेळ आहे.

कर्क रास (Cancer Zodiac Horoscope)

मंगळ नुकताच कर्क राशीतून बाहेर पडल्याने अजूनही काही अंशी प्रभाव कायम असू शकतो. दशमातील गुरू आनंदी, सांसारिक सुख भोगणारा उच्च मनोवृत्तीचा असतो. विशेष म्हणजे मेष राशीतील गुरू राजकारण, सामाजिक क्षेत्रात उद्योगधंद्यात आपले कर्तृत्व उत्तमरीतीने दाखवून देतो. गुंतवलेले, अडकलेले व कमावलेले आर्थिक बळ लाभून तुम्ही आयुष्याला अन्य मार्गांनी समृद्ध करणाऱ्या विषयात लक्ष घालू शकाल. एखादे प्रेमाचे नाते तयार होऊ शकते.

सिंह रास (Leo Zodiac Horoscope)

सिंह राशीच्या नवमस्थानात होणारा गुरू-राहू चांडाळ योग काहीसा असाच त्रासदायक ठरू शकतो. गुरू-राहूच्या या युतीमुळे सामाजिक कार्यात, राजकारणात आपल्याला मानापमानाच्या प्रसंगांना सामोरे जाऊ शकते पण अशावेळी मंगळाचा वरदहस्त आशेचा किरण ठरू शकतो. आपण अध्यात्माशी जोडले जाऊ शकता जेणेकरून मानसिक चलबिचल दूर होऊ शकते. वाडवडिलांच्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. अडकलेली कामे मार्गी लागू शकतात ज्याचा आर्थिक फायदा येत्या काही दिवसांमध्ये प्राप्त होऊ शकतो.

हे ही वाचा<< गुरु पौर्णिमेला लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने ४ राशींवर बरसणार पैशांचा पाऊस? तुमची रास काय सांगते वाचा

तूळ रास (Libra Zodiac Horoscope)

तूळ राशीच्या सप्तमस्थानात गुरुदेव आहेत. उद्योगधंदा, भागीदारी, कौटुंबिक सौख्य या सर्वांसाठी नको तितके सामंजस्य आणावे लागेल पण पंचमातील कुंभेचा शनी व षष्ठातील गुरूसादृश नेपच्यून आपल्याला आधार देणारे ठरतील. तुमच्या कुंडलीत धन स्थानी मंगळ असल्याने भागीदारीतून धनप्राप्ती होऊ शकते. तुम्हाला जोडीदाराची साथ समृद्ध करू शकते ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची सुद्धा चिन्हे आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, यास अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू समजू नये)