Dainik Rashi Bhavishya In Marathi, 10 July 2025: आज १० जुलै २०२५ रोजी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा आहे. पौर्णिमा रात्री २ वाजून ७ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज रात्री ९ वाजून ३८ मिनिटांपर्यंत इंद्र योग जुळून येईल. उद्या सकाळपर्यंत म्हणजेच ५ वाजून ५६ मिनिटांपर्यंत पूर्वाषाढ़ा नक्षत्र जागृत असणार आहे.आज राहू काळ १:३० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असणार आहे. दिनविशेष पाहिल्यास आज गुरुपौर्णिमा आहे. यंदा गुरुवारी गुरूपौर्णिमेचा योग जुळून आला आहे. तर त्याचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी तुम्हाला राशीनुसार काय करावं लागेल जाणून घेऊया…

१० जुलै २०२५ पंचांग व राशिभविष्य (Rashi Bhavishya In Marathi, 10 July 2025 )

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

हातून एखादे चांगले काम होईल. प्रयत्नात कसूर करून चालणार नाही. जुन्या मित्रांसोबत दिवस मजेत घालवाल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. उत्तम कौटुंबिक सौख्य मिळेल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

हाती घेतलेल्या कामाकडे आधी लक्ष द्यावे. अरबट-चरबट खाऊ नका. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. दिवसभर काहींना-काही काम मागे राहील. गोड बोलून कार्यभाग साधाल.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

प्रसन्नता पूर्वक दिवसाची सुरुवात होईल. अधिक उत्साहाने कामे कराल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवाल. दिवस चांगला जाईल.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

मनात अनामिक चिंता निर्माण होईल. भावनेच्या आहारी जाऊ नये. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. फसवणुकीपासून सावध राहावे. अति श्रमामुळे थकवा जाणवेल.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

चांगले मानसिक स्वास्थ लाभेल. आंतरिक सृजनशीलता लाभेल. काहीतरी नवीन करण्याची ऊर्मी दाटून येईल. जवळचे मित्र भेटतील. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

कामाची धांदल उडेल. आपल्याला सातत्याची गरज भासेल. वेळ आणि काम यांचा मेळ घालावा. स्वत:च्या फायद्याकडे अधिक लक्ष द्याल. हातातील कामे सुरळीत पार पडतील.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

धार्मिक अनुष्ठान साधाल. परोपकारातून परमार्थ साधता येईल. कमी श्रमातून अधिक फायद्याचा विचार कराल. गोड बोलण्याला भुलून जाऊ नका. आत्मविश्वास वाढीस लागेल.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

नातलगांची गाठ पडेल. तुमच्यातील क्रोधाला खतपाणी घातले जाईल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा लागेल. चटकन कोणत्याही निष्कर्षावर येऊ नका. मित्रांना दुखावून चालणार नाही.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

मुलांच्या सौख्यात आनंद मानाल. जुनी कामे नव्याने अंगावर येतील. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. सुरस भोजनाची प्राप्ती होईल. जोडीदाराकडून समाधान मिळेल.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

तब्येतीच्या किरकोळ तक्रारी कमी होतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. धार्मिक व्यवहारात लक्ष घालाल. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नये. इतरांचा विश्वास संपादन करावा.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

नवीन कामे अंगावर येतील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. दिवस गप्पा-गोष्टींमध्ये घालवा. आपल्या मनातील गुज मोकळेपणाने सांगावे. फक्त शब्दांची धार लक्षात घ्यावी.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

कामात चांगली सफलता मिळेल. व्यापार्‍यांची येणी वसूल होईल. पत्नीशी मतभेदाची शक्यता. मुलांचे विचार जाणून घ्यावेत. घाईने केलेले काम चुकू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर