Guru Rise 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी संक्रमण करतात ज्याचा मानवी जीवनावर तसेच देश आणि जगावर परिणाम होतो. देवांचा गुरू, सध्या मिथुन राशीत भ्रमण करत आहे आणि १२ अंश ते १८ अंशांपर्यंत तरुण स्थितीत राहील. अशा परिस्थितीत काही राशींचे नशीब उजळू शकते. तसेच, या राशींना अचानक आर्थिक लाभ आणि सौभाग्य मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…
मिथुन
गुरू ग्रहाची युवा अवस्था तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण गुरु ग्रह तुमच्या राशीतून सातव्या आणि दहाव्या स्थानाचा स्वामी आहे. तसेच, शनिदेव दहाव्या घरात स्थित आहेत. त्यामुळे, विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन यावेळी आनंदी राहील. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.तसेच, या काळात तुम्हाला आदर आणि सन्मान मिळेल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. काम आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. उच्चपदस्थ आणि प्रतिष्ठित लोकांशी तुमचे संबंध देखील विकसित होतील.तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पैसे मिळू शकतात. तुम्ही परदेशात प्रवास करू शकता.
सिंह राशी
गुरू ग्रहाची युवा अवस्थेतील हालचाल सिंह राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते. कारण गुरु ग्रह तुमच्या राशीतून उत्पन्नाच्या घरात संक्रमण करत आहे आणि सूर्य देव सध्या तेथे स्थित आहे. तसेच, तो पाचव्या आणि आठव्या घराचा स्वामी आहे. तुम्हाला यावेळी मूल होऊ शकते. तुम्ही एखाद्या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकता. तसेच, स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकते. तुम्हाला मित्रांकडून फायदा होऊ शकतो. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो.
कन्या राशी
तुमच्यासाठी, गुरू ग्रहाची युवा अवस्था करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकते. कारण गुरु तुमच्या राशीतून कर्मभावात भ्रमण करत आहे. तसेच, तो तुमच्या गोचर कुंडलीतील चौथ्या आणि सातव्या घराचा स्वामी आहे.त्यामुळे, या वेळी तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते. तुम्ही काही लक्झरी वस्तू देखील खरेदी करू शकता. बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. व्यावसायिकांना चांगले पैसे मिळू शकतात.