वैदिक ज्योतिषशास्त्रात २७ नक्षत्रांचे वर्णन केले आहे. यापैकी काही नक्षत्रे अतिशय शुभ मानली जातात. त्यातील एक गुरु पुष्य योग आहे. म्हणजे पुष्य नक्षत्र रविवारी किंवा गुरुवारी आले तर ते खूप शुभ असते. यावेळी गुरुवार, २५ ऑगस्ट रोजी पुष्य नक्षत्र तयार होत आहे. या योगात सोने-चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. हा शुभ काळ आहे. २५ ऑगस्टला आणखी काही खास योग होत आहेत. हे योग्य कोणते आहेत ते जाणून घेऊया.

ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटले जाते. वैदिक पंचांगानुसार २५ ऑगस्ट रोजी सूर्योदयापासून सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत गुरु पुष्य योग राहील. वैदिक ज्योतिषात गुरु पुष्य हा सुख आणि समृद्धीसाठी अत्यंत शुभ योग मानला जातो. या दिवशी सोने, घर, वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते. यासोबतच या दिवशी काही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर व्यवसाय चांगला चालतो आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. या योगामध्ये तुम्ही गृहप्रवेश देखील करू शकता. मात्र, या योगात विवाह विधी केले जात नाहीत कारण या योगाला ब्रह्मदेवाचा शापही लाभला आहे.

सूर्य आणि गुरूने मिळून तयार केला ‘महाविनाशक षडाष्टक योग’; ‘या’ राशींच्या अडचणीत होणार वाढ; त्वरित व्हा सावध

  • सर्वार्थ सिद्धी योग

ज्योतिष पंचांगानुसार या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहे. हा योग सूर्योदयापासून सायंकाळी सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत राहील. या योगामध्ये केलेले कार्य सिद्ध होते. या योगात तुम्ही व्यवसाय सुरू केल्यास त्यात चांगले यश मिळते.

  • अमृत ​​सिद्धी योग

पंचांगानुसार २५ ऑगस्टला अमृत सिद्धी योगही तयार होत आहे. या योगात उपासना केल्याने दुहेरी फळ मिळते. या योगामध्ये लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करण्याचा नियम आहे.

Astrology: कुंडलीतील ‘हे’ संकेत सांगतात तुमच्यावर देवाची कृपा आहे की नाही! जाणून घ्या

  • कलात्मक योगाची निर्मिती

या दिवशी चंद्रही त्याच्या कर्क राशीत असेल. हे अत्यंत शुभ आहे. कारण चंद्र देखील देवी लक्ष्मीशी संबंधित आहे आणि त्याला लक्ष्मीचा भाऊ म्हणतात. त्याच वेळी शुक्र ग्रहदेखील या दिवशी कर्क राशीत असेलमी, त्यामुळे कलात्मक योग निर्माण होत आहेत.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)