ज्योतिषशास्त्रात काही ग्रह दर महिन्याला प्रतिगामी होतात आणि संक्रमण करतात. त्यांचे शुभ-अशुभ परिणाम व्यक्तीच्या जीवनावर दिसून येतात. २९ जुलै रोजी गुरु ग्रह मीन राशीत प्रतिगामी होणार आहे. गुरु हा शुभ ग्रह मानला जातो. त्याच वेळी, त्याला ज्ञान, शिक्षण आणि नशीब वाढवणारा ग्रह म्हटले जाते. गुरु प्रतिगामी होताच सर्व राशींच्या जीवनावर प्रभाव पडेल. पण यापैकी काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येणार आहे. २९ जुलैचा गुरू मीन राशीत प्रतिगामी होईल आणि तो प्रतिगामी होताच चार राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

  • मकर

ज्योतिष शास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांना या काळात विशेष लाभ मिळतील. त्यांच्यासाठी काळ अनुकूल राहील. नशीब पूर्ण साथ देईल. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कमाईचे अनेक मार्ग खुले होतील. एवढेच नाही तर अचानक आर्थिक लाभ होईल.

Astrology : नकळतही करू नयेत ‘या’ चुका; अन्यथा शुक्र, शनि, गुरू देतील अशुभ परिणाम

  • कर्क

या राशीच्या नवव्या घरात गुरु प्रतिगामी होईल. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. त्याच वेळी, नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी चांगली बातमी येऊ शकते. रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात चांगला नफा मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे.

  • वृश्चिक

ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी नोकरीत प्रगतीसोबतच उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात व्यवसायात चांगला फायदा होईल. गुंतवलेल्या पैशाचा फायदा तुम्हाला मिळेल. वैवाहिक जीवन सुखकर राहील.

Zodiac Compatibility: ‘या’ राशींच्या जोड्या ठरतात सर्वोत्कृष्ट! जाणून घ्या, तुमच्यासाठी कोणत्या राशीचा जोडीदार असेल योग्य

  • सिंह

गुरु प्रतिगामी होताच या राशीच्या लोकांसाठी शुभ काळ सुरू होईल. या काळात धनलाभ होईल. व्यापाऱ्यांना फायदा होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. गुरु प्रतिगामी असल्याने प्रवासाचे योग बनत आहेत, जे शुभ सिद्ध होतील. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठीही हा काळ अनुकूल आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)