वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रहाचं संक्रमण किंवा उदय-अस्त होतो तेव्हा त्याचा थेट मानवी जीवनावर परिणाम होतो. गुरु ग्रह अस्ताला गेल्याने काही राशींवर नकारात्मक प्रभाव होत आहे. गुरु ग्रह पुढच्या महिन्यात २२ फेब्रुवारीला अस्ताला गेला आहे. गेल्या महिन्यात अस्ताला गेलेला गुरू २३ मार्च रोजी उदयास येणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात बृहस्पती ग्रहाला गुरु म्हणतात. हा धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे. कर्क ही उच्च राशी आहे, तर मकर हे त्याचे निम्न राशी आहे. गुरु हा ज्ञान, शिक्षक, मुले, मोठा भाऊ, शिक्षण, धार्मिक कार्य, पवित्र स्थान, संपत्ती, दान, पुण्य आणि वृद्धी इत्यादींचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रात, गुरु हा २७ नक्षत्रांमध्ये पुनर्वसु, विशाखा आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्राचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रहाची कृपा असलेल्या व्यक्तीमध्ये सात्विक गुण विकसित होतात. त्याच्या प्रभावाने माणूस सत्याच्या मार्गावर चालतो. त्यामुळे गुरूच्या उदयाचा सर्व राशींवर परिणाम होईल, परंतु तीन राशी आहेत त्यांना विशेष लाभ मिळू शकतो. चला जाणून घेऊयात कोणत्या तीन राशी आहेत.

मेष: तुमच्या राशीत गुरुचा अकराव्या स्थानात उदय होईल. या स्थानाला उत्पन्नाचे स्थान म्हटलं जातं. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. व्यवसायात लाभ होऊ शकतो. प्रतिष्ठा वाढू शकते. तसेच जागा बदलण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन करार निश्चित केला जाऊ शकतो. हा करार भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
27 March Daily Mesh To Meen Rashi Bhavishya
२७ मार्च पंचांग, राशी भविष्य: कुणाच्या नशिबी नात्यांचं प्रेम, सुख व गोडवा तर कुणाची वाढेल डोकेदुखी, आज काय होणार?

वृषभ: गुरु ग्रहाचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण बृहस्पतीचा राशीतील दहाव्या स्थानात उदय होत आहे. या स्थानाला कर्म, व्यवसायाचे कार्यक्षेत्र म्हणतात. त्यामुळे तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. तसेच यावेळी तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. या काळात तुमची कार्यशैली देखील सुधारेल. ज्यामुळे कामाच्या ठिकाणी कौतुक केलं जाईल.

Budh Gochar 2022: बुध ग्रहाचा शनीच्या राशीत प्रवेश, ‘या’ चार राशींना मिळणार नशिबाची साथ

सिंह: तुमच्या राशीतील सप्तम भावात गुरु ग्रहाचा उदय होईल. याला वैवाहिक जीवन आणि भागीदारीचे स्थान म्हणतात. या काळात तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील. तुम्ही अजूनही अविवाहित असाल तर तुम्हाला लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. तसेच भागीदारीच्या कामात नफा मिळवू शकता किंवा आपण या काळात भागीदारीत कार्य सुरू करू शकता. सिंह राशीचा स्वामी सूर्य देव आहे. सूर्य आणि गुरु या ग्रहांमध्ये मैत्रीची भावना आहे, त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असू शकतो.