Guru Uday 2025 Impact in Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या ग्रहाचा जेव्हा उदय होतो किंवा अस्त होतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर पडतो. आता जुलै महिन्यात ग्रह गोचरासह ग्रहांचे उदय सुद्धा होणार आहेत.  ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रहाला ज्ञान, बुद्धी, धर्म, संपत्ती, अध्यात्म, शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये गोचर फार महत्त्वाचं समजलं जातं. ग्रहांच्या राशी परिवर्तनाला गोचर म्हणतात. सुख, संपत्ती, वैभव, ऐषोराम आणि ऐश्वर्याचा कारक असलेल्या गुरुचा राशी बदल अनेकार्थांनी महत्त्वाचा ठरतो. सध्या गुरु मिथुन राशीत विराजमान आहेत आणि ९ जुलै २०२५ रोजी पहाटे ४:४४ वाजता देवगुरु मिथुन राशीत उदयास येणार आहेत. गुरु उदयानंतर ५ राशींच्या नशिबात अभूतपूर्व बदल होणार आहेत. या प्रभावाने पाच राशींच्या मंडळींना धन लाभ व मान- सन्मानात वृद्धी झाल्याचे जाणवणार आहे. या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना कोणत्या रूपात लाभ होऊ शकतो हे पाहूया..

गुरु उदयाने बदलणार नशिबाचा तारा! ‘या’ ५ राशींचा सुरू होणार गोल्डन टाइम!

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरुचा उदय अत्यंत शुभ ठरु शकतो. उच्च पदाची संधी, आर्थिक वाढ आणि सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय जुने अडथळे दूर होऊन कामात यश लाभू शकतो. आर्थिक स्थितीही चांगली राहून तुम्ही या काळात पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता.

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी गुरुचा उदय फायदेशीर ठरु शकतो. व्यवसायात फायदेशीर सौदे होऊ शकतात. समाजात सन्मान वाढू शकतो. विदेश प्रवास किंवा उच्च शिक्षणाच्या संधीही या काळात मिळू शकतात. नोकरदार लोकांना बढती आणि वेतनवाढ मिळू शकते.

तूळ (Libra)

गुरुचा उदय तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरु शकतो. विशेषतः या राशीतील मंडळींना कायदा, लेखन, शिक्षण क्षेत्रात मोठी झेप मिळू शकते. पैसा आणि करिअरच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होऊ शकतात. वाणी मधुर होईल आणि नवे नाते मजबूत होऊ शकतात. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे.

मकर (Capricorn)

गुरुच्या उदयामुळे मकर राशीच्या व्यक्तींना भाग्याचा पूर्ण साथ लाभू शकतो. जुन्या योजना यशस्वी होऊ शकतात. याकाळात आपल्याला भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. नोकरीत बढती, वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

मीन (Pisces)

मीन राशीवर गुरुची थेट कृपा असल्याने आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अतिशय अनुकूल आहे. या राशीला येत्या काळात प्रचंड मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक प्रवासाचे योग संभवतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)