Aajche Rashi Bhavishya In Marathi 18 September 2025 : आज १८ सप्टेंबर २०२५ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी असणार आहे. आज शिव योग जुळून येईल आणि पुष्य नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच आज गुरुपुष्यामृत योग जुळून येणार आहे. गुरुपुष्यामृत योग म्हणजे गुरु ग्रह पुष्य नक्षत्रात असतो. या योगात लक्ष्मी आणि विष्णू देवाची पूजा केली जाते. तर गुरुपुष्यामृत योग तुमच्या राशीसाठी कसा असणार जाणून घेऊया…
१८ सप्टेंबर २०२५ पंचांग व राशिभविष्य (Rashi Bhavishya In Marathi 18 September 2025 )
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)
माहीत नसलेल्या कामात लक्ष घालू नका. ठरवलेले विचार अचानक बदलू नका. वरिष्ठ अधिकार्यांचे सहकार्य लाभेल. परदेश कंपनीकडून लाभाचे योग. उत्पन्नात वाढ होईल.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today In Marathi)
हातातील कामाला यश लाभेल. शेजार्यांची मदत घेता येईल. धन वृद्धीचे योग जुळून येतील. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)
नवीन कामात हात घालू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ शक्य. मुलांची एखादी कृती त्रस्त करू शकते. कौटुंबिक वातावरण जपावे. मनोबल वाढीस लागेल.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)
काटकसरीपणाचा फायदा होईल. दुसर्याच्या स्वभावातील दोष दर्शवू नका. आजचा दिवस लाभदायक. ज्येष्ठ व्यक्तींचे अमूल्य सहकार्य लाभेल. कार्य शक्तीचे कौतुक केले जाईल.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)
इतरांना सल्ला देण्याचे काम उत्तम करू शकाल. नेहमीसारखी आनंदी वृत्ती जागृत ठेवा. तुमच्या ज्ञानाच्या अनुभवाचे कौतुक केले जाईल. तुमच्या बोलण्याचा समोरच्यावर प्रभाव पडू शकेल. सारासार विचार लाभदायक ठरेल
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)
आजूबाजूचे धूर्त लोक ओळखून रहा. लपवाछपवी च्या गोष्टी करू नका. धन संचयात वाढ होण्याची शक्यता. बचतीच्या योजना आखाल. मागे हटू नका.
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)
स्वत:च्या मतावर ठाम रहा. गोड बोलून कार्यभाग साधावा. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. कामात सुलभता जाणवेल. प्रलंबित योजना मार्गी लावाल.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)
आग्रहाला बळी पडू नका. मोठे काम करताना सावधानता बाळगावी. तीव्र इच्छा जागृत ठेवावी. वस्तु खरेदी करताना चोखंदळ रहा. अन्यथा नुकसान संभवते.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)
विद्यार्थ्यांना उत्तम काळ राहील. संमिश्र घटनांचा दिवस. कौटुंबिक प्रश्न प्राधान्याने सोडवा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. क्षुल्लक गोष्टीने खट्टू होऊ नका.
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today In Marathi)
नवीन कामात आळस करू नका. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. योग्य संधीची वाट पाहावी. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. कामाच्या स्वरुपात काहीसा बदल संभवतो.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)
मनातील विचार बोलून दाखवा. चुकीच्या विचारणा प्रयत्नपूर्वक दूर सारा. आर्थिक गोष्टींकडे कटाक्षपणे लक्ष द्या. विवाह इच्छुक असलेल्यांना शुभ वार्ता मिळेल. नेतृत्व गुण वाढीस लावा.
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)
इतरांचे प्रेम संपादन करा. महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या संपर्कात याल. मुलांना नवीन संधि लाभू शकते.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर