चैत्र प्रतिपदेपासून हिंदू नववर्ष सुरू होते. यावर्षी ही तारीख २ एप्रिल २०२२ रोजी शनिवारी येत आहे. येणारे वर्ष सर्व राशींसाठी काही ना काही घेऊन येत आहे. टॅरो कार्ड रीडर आचार्य रणमीत कौर यांच्याकडून जाणून घ्या सर्व १२ राशींसाठी हिंदू नववर्ष कसे असेल.

मेष :

टॉवर कार्ड सूचित करत आहे की या वर्षी व्यवसाय आणि नातेसंबंधांमधील विश्वास कमी झाल्यामुळे तुम्ही निराश व्हाल. उत्पन्न जास्त असले तरी वाढत्या खर्चाचा त्रास होऊ नये म्हणून आधीच तयारी करणे उचित ठरेल. वैवाहिक जीवनात काही अडचणी येतील. शिक्षण क्षेत्रात संघर्ष होईल. जास्त ताण, नैराश्य आणि धावपळ यामुळे हृदय, रक्तदाब, हार्मोनल तसेच पोटाशी संबंधित समस्या जाणवतील. वर्षाचा शेवटचा टप्पा अडचणी दूर करेल. यामुळे तुम्ही आनंदी असाल. अडचणी कमी करण्यासाठी दररोज भगवान शंकराची आराधना करा आणि गाईला हिरवा चारा खाऊ घाला.

रत्न परिधान करण्यात झालेली चूक ठरू शकते मोठ्या समस्येचे कारण; जाणून घ्या योग्य पद्धत

वृषभ :

पेंटॅकल्स कार्ड दर्शवत आहेत की या वर्षी तुम्हाला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. तुमची गुप्त माहिती कोणाशीही शेअर करणे टाळा. उत्पन्न वाढेल पण खर्चही वाढतील. या वर्षी, जागा बदलण्याची शक्यता आहे, तुम्ही प्रवासाला जाऊ शकता किंवा घर देखील बदलू शकता. कामाच्या ठिकाणीही बदल केले जाऊ शकतात. वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. या वर्षी तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या आरोग्याबाबत चिंतेत असाल.

मिथुन :

एस ऑफ पेंटॅकल्स कार्ड हे वर्ष आर्थिकदृष्ट्या भरभराटीचे असल्याचे संकेत देत आहे. कार्यक्षेत्रात लाभाच्या विशेष संधी मिळतील. प्रेमसंबंध तुमच्या आयुष्यात नवीन वसंत आणेल. कुटुंबातील सदस्य जवळ येतील आणि घरात काही कार्यक्रम आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये भाग्य विशेष साथ देईल. या वर्षी प्रवासात काळजी घेणे आवश्यक आहे. हाडांच्या समस्या, निद्रानाश, मासिक पाळीचे आजार, पित्तदोष आणि त्वचारोग इत्यादी समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

कर्क :

या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कामाच्या ठिकाणी वादविवाद झाल्यामुळे तुमच्या उत्पन्नावर परिणाम होईल असे फाइव्ह ऑफ वँड्स कार्ड सूचित करत आहे. तुमचे विरोधक तुम्हाला अनेक प्रकारे मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतील. वर्षाच्या उत्तरार्धात आर्थिक समस्या दूर होतील आणि तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी वादामुळे वैवाहिक जीवन खराब होईल. दररोज हनुमान चालीसा वाचा आणि वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घेत राहा.

सिंह :

पेज ऑफ वँड्स कार्ड हे दर्शविते की या वर्षी तुम्ही उत्साहाने भरलेले असाल आणि तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही कौतुकास पात्र असाल. चांगल्या आर्थिक लाभासोबतच पद आणि प्रतिष्ठेमध्येही प्रगती होईल. काही चांगल्या बातम्या मिळाल्याने तुम्ही रोमांचित व्हाल. तुमच्या मुलांशी तुमचे नाते घट्ट होईल. शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल. प्रवासासाठी हे वर्ष चांगले राहील. वैवाहिक जीवनात प्रेमाचे नवे वारे वाहतील ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि श्वसन, गुद्द्वार, संबंधित आजारांबाबत काळजी घ्या.

‘या’ राशींच्या लोकांना मिळणार शनिदेवाच्या त्रासापासून मुक्ती; जाणून घ्या यामागील कारण

कन्या :

सेव्हन ऑफ वँड्स कार्ड, या वर्षी कार्यक्षेत्रातील विरोधकांमुळे मानसिक त्रासाचे संकेत देत आहे. विशेषत: जून महिन्यात काळजी घेण्याची गरज आहे. कौटुंबिक वाद आणि जोडीदाराच्या वागण्यात थोडा कोरडेपणा यामुळे तुमचा धर्माकडे कल वाढेल. आई किंवा मुलांच्या आरोग्याला घेऊन चिंतेत असाल. स्पर्धा परीक्षांसाठी हे वर्ष चांगले आहे.

तूळ :

एस ऑफ स्वॉर्ड हे कार्ड या वर्षात जुन्या अडचणी संपवण्यासाठी अनेक नवीन संधी उपलब्ध होणार असल्याचे संकेत देत आहेत. घाईघाईने केलेल्या चुकीमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, वर्षाच्या उत्तरार्धात विशेष आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील पण शब्दांवर नियंत्रण ठेवा. जुलैनंतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. प्रवासात काळजी घेणे आवश्यक आहे. पचन आणि जननेंद्रियांशी संबंधित आजारांमुळे हॉस्पिटलचा खर्च वाढू शकतो.

वृश्चिक :

एस ऑफ कप्स हे कार्ड या वर्षाच्या जुन्या अडचणी दूर होऊन तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत देत आहे. प्रेमातील यशासोबतच कुटुंबात उत्सवाचे वातावरण राहील. या वर्षी भाग्याची विशेष साथ मिळेल. जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. हृदय, सांधेदुखी, मायग्रेन, ल्युकोरिया इत्यादी आजारांबाबत जागरुक राहण्याची गरज आहे.

धनु :

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाल्याने या वर्षी तुम्हाला क्षेत्रात यश मिळेल असे संकेत वर्ल्ड कार्ड देत आहे. जुन्या समस्या संपतील आणि तुम्ही समृद्ध भविष्याकडे वाटचाल कराल. वैवाहिक जीवनात थोडी उदासीनता राहील, परंतु ऑक्टोबरनंतर वैवाहिक जीवन सुखकर होईल. शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल. या वर्षी तुम्ही स्वतःला निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवाल, त्यामुळे आरोग्य चांगले राहील.

सामुद्रिक शास्त्र : माणसाच्या पायाची रचना त्याच्या स्वभावाविषयी सांगते बरेच काही

मकर :

द फूल कार्ड तुम्हाला नवीन संधींसाठी लवचिक राहण्याची सूचना देते. तुमच्या रूढीवादी विचारसरणीमुळे एखादी सुवर्णसंधी तुमच्या हातातून निसटू शकते. आर्थिक लाभ झाला तरी होणारे खर्च त्रास देतील. आई आणि पत्नीच्या तब्येतीची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात थोडी उदासीनता अनुभवाल. परिश्रमानंतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. कमी रक्तदाब, नैराश्य, अस्वस्थता, त्वचारोग अशा समस्या संभवतात.

कुंभ :

कोणता तरी करार संपुष्टात आल्याने हे वर्ष अस्वस्थ होणार असल्याचे डेथ कार्ड सूचित करत आहे. आर्थिकदृष्ट्या वर्षाचा पूर्वार्ध काहीसा कठीण जाईल, पण ऑक्टोबरपासून आर्थिक समस्या दूर होतील. ठिकाण बदलण्याची किंवा प्रवासाची शक्यताही वर्तवली जात आहे. वैवाहिक संबंध किंवा प्रेम संबंधात विभक्त होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष यश मिळत नाही. उच्च रक्तदाब आणि मधुमेह आणि श्वास, गुदव्दार, संबंधित आजार त्रास देतील.

मीन :

टेन ऑफ कप कार्ड दर्शवत आहे की यावर्षी विरोधक कार्यक्षेत्रात सक्रिय असतील परंतु तुम्हाला त्यांच्यावर विजय मिळेल. तुम्ही आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हाल आणि कुटुंबात उत्सवाचे वातावरण असेल. प्रेमसंबंधांसाठी हे वर्ष चांगले आहे. पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देतील. मुलांमुळे खर्च वाढू शकतो. या वर्षी श्री कृष्ण-रुक्मणीची आराधना करा आणि ‘जय कृष्ण-रुक्मणी प्रेमसागर’ हे वाक्य दररोज कोणत्याही पेपर किंवा सोशल मीडियावर लिहा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)