Today Rashi Bhavishya, 15 December 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

घरातील वातावरण चांगले राहील. मुलांसोबत मजेत वेळ घालवाल. काही धार्मिक विधींनी मनाला शांति मिळेल. प्रेमातील व्यक्तींना चांगला दिवस. मनातील इच्छा बोलून दाखवाल.

budh gochar 2024 astrology mercury planet transit of gemini in may will change the luck of these zodiac sing get more profit know
वर्षानंतर बुधाचा मिथुन राशीत प्रवेश; ‘या’ राशीधारकांच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण? धन-संपत्तीत भरभराटीची शक्यता
May 2024 Monthly Horoscope in Marathi
३१ मेपर्यंत ‘या’ राशींना मिळेल सुखाचा गारवा; पहिल्या दिवसापासून कुंडलीत मोठे बदल, लाभ कुणाला? १२ राशींचे भविष्य वाचा
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?

वृषभ:-

आपल्याला हवी असणारी उत्तरे मिळतील. नवीन योजनांसाठी अधिक वेळ द्यावा लागेल. पुढील गोष्टींचे नियोजन करावे लागेल. मानसिक शांतता लाभेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.

मिथुन:-

जुनी उधारी वसूल होईल. घरातील वातावरण चांगले राहील. जवळच्या ठिकाणी प्रवास घडेल. भावंडांची चांगली मदत होईल. कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील.

कर्क:-

मानसिक चंचलता जाणवेल. नवीन कामासाठी चांगला वेळ. हातातील काम फलदायी असेल. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कराल. व्यापारी वर्गाला चांगला दिवस.

सिंह:-

व्यावसायिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवा. दिवस आपल्या मनासारखा घालवाल. कार्यक्षेत्रात वाढीव मेहनत घ्यावी लागेल. वडिलांचे सहकार्य प्राप्त होईल.

कन्या:-

मित्रांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. घरात धार्मिक वातावरण राहील. बोलताना तारतम्य बाळगा. संयमाने परिस्थिती हाताळावी. कौटुंबिक खर्चाला आळा घालावा.

तूळ:-

आपल्याच धुंदीत दिवस घालवाल. स्वत:चेच म्हणणे खरे कराल. मनातील इच्छेला अधिक महत्त्व द्याल. नवीन प्रकल्पावर काम सुरू करावे. व्यावसायिकांना चांगला लाभ होईल.

वृश्चिक:-

अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणुकीला चांगला काळ आहे. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल. कामातील समस्या दूर होतील. नवीन ओळख होईल.

धनू:-

नातेवाईकांच्या होकारात होकार मिसळू नका. स्वत: तारतम्य बाळगून विचार करावा. कामाच्या ठिकाणी फक्त आपल्या कामाकडेच लक्ष द्यावे. राजकारणापासून दूर राहावे. मित्रांसाठी मदतीचा हात पुढे कराल.

मकर:-

काम आणि वेळ यांचा समन्वय साधावा. चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालू नका. नियमांचे काटेकोर पालन करा. अति विचार करत बसू नका. भावंडांची बाजू समजून घ्यावी.

कुंभ:-

कामाच्या बदललेल्या स्वरूपाशी जुळवून घ्या. समोरच्या व्यक्तीचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. व्यापारी वर्गाला चांगला दिवस. भागीदारीच्या व्यवसायात काटेकोर राहावे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.

मीन:-

अंग मेहनतीला मागे हटु नका. मित्रांची बरेच दिवसांनी गाठ पडेल. नवीन संपर्कातून काही गोष्टी समोर येतील. नोकरदारांना दिवस समाधानकारक जाईल. संयमाने कामे करावीत.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर