Panchak 2025: सनातन धर्मात कोणतेही काम करण्यापूर्वी शुभ वेळ किंवा मुहूर्त आवर्जून पहिला जातो. ज्याप्रमाणे प्रत्येक महिन्याचा शुभ काळ ज्योतिषशास्त्रात वर्णन केला आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात एक अशुभ काळदेखील असतो. यामध्ये कोणत्याही प्रकारची शुभ कार्य केली जात नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे पंचक. दर महिन्याला येणारे पंचक हे अत्यंत अशुभ काळात गणले जाते. हा ५ दिवसांचा काळ असतो. तर मग जाणून घेऊ पंचक म्हणजे नेमकं काय? पंचक अशुभ का मानले जाते? याचे किती प्रकार आहेत? लोकांच्या आयुष्यावर पंचकचा कसा परिणाम होतो?

पंचक म्हणजे काय?

पाच दिवसांच्या नक्षत्रांच्या विशेष संयोगाला पंचक म्हणतात. हे पाच दिवस शुभ आणि अशुभ कामांसाठी पाहिले जातात. पंचक काळात काही कामे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. पंचक हा पंचांगाचा एक विशेष भाग आहे. ज्यतिषतज्ज्ञांच्या मते, जेव्हा चंद्र कुंभ राशीतून मीन राशीत जातो, तेव्हा पंचकाचा प्रभाव होतो. साधारणपणे चंद्राच्या पाच महत्त्वाच्या नक्षत्रांमधून जाण्याचा काळ असे याला मानले जाते.

पंचक कधी आणि कसा होतो?

जेव्हा चंद्र धनिष्ठा, शतभिषा, पूर्वभाद्रपद, उत्तर भाद्रपद आणि रेवती या नक्षत्रांमधून जातो तेव्हा पंचक काळ येतो. या पाच नक्षत्रांमुळे याला पंचक म्हणतात. हा काळ अंदाजे पाच दिवसांचा असतो आणि तो अशुभ मानला जातो. या काळात घर बांधणे, प्रवास करणे किंवा वस्तू गोळा करणे निषिद्ध मानले जाते.

पंचक काळात शुभ कार्य का टाळले जाते?

ज्योतिषशास्त्रानुसार, पंचक काळ अशुभ आणि हानिकारक मानला जातो. हा काळ चंद्र कुंभ आणि मीन राशीतून भ्रमण करतो. या काळात अनेक राशी आणि नक्षत्रांच्या प्रभावामुळे अशुभ परिणाम होतात. जीवनावर नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी पंचक काळादरम्यान शुभ कार्य टाळणे योग्य आहे.

पंचकाचे पाच प्रकार

पंचक पाच भागा विभागले आहे. रोग पंचक, नृप पंचक, चोर पंचक, मृत्यू पंचक आणि अग्नि पंचक. रविवारपासून २ नोव्हेंबरपासून सुरू होणारा रोग पंचक आरोग्यासाठी हानिकारक आहे सोमवार ३ नोव्हेंबरचा नृप पंचक सरकारी कामासाठी शुभ आहे, पण वैयक्तिक कामासाठी अशुभ आहे. शुक्रवार ७ नोव्हेंबरच्या चोर पंचकमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. शनिवारचा मृ्त्यू पंचक त्रास घेऊन येतो आणि मंगळवारचा अग्निपंचक घरबांधणीसारख्या प्रकल्पांसाठी प्रतिकूल मानला जातो.

पंचक दरम्यान कोणते नक्षत्र नुकसान करतात?

धनिष्ठा नक्षत्रात आगीचा धोका असतो, तर शतभिषामुळे भांडणे होण्याची शक्यता वाढते. पूर्वा भाद्रपद नक्षत्रामुळे आरोग्य समस्या उद्भवू शकतात, तर उत्तरा भाद्रपदामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. तसंच रेवती नक्षत्रामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. या नक्षत्रांमध्ये प्रवास करणे, दक्षिणेकडे जाणे किंवा नवीन पलंग बनवणे टाळावे.

पंचक दरम्यान शुभ कार्य

पंचक साधारणपणे अशुभ मानले जाते. मात्र, काही नक्षत्र शुभ कार्यांसाठी अनुकूल असतात. उत्तर भाद्रपद नक्षत्र सर्वार्थ सिद्धी योग बनवते. धनिष्ठाआणि शतभिषा नक्षत्रांमध्ये प्रवास कऱणे किंवा यंत्रसामग्रीसह काम करणे शुभ असते, तर रेवती नक्षत्रात व्यवसाय, कपडे किंवा दागिने खरेदी करणे फायदेशीर असते.