Horoscope Today In Marathi, 10 August 2025 : आज १० ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी दुपारी १२ वाजून ११ मिनिटांपर्यंत असेल; त्यानंतर द्वितीया तिथी सुरु होईल. रात्री १२ वाजून २ मिनिटांपर्यंत शोभन योग जुळून येईल. दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपर्यंत धनिष्ठा नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ ४:३० वाजता सुरु होईल ते ६ वाजेपर्यंत असणार आहे. रविवारी तुमचा दिवस कसा जाणार चला जाणून घेऊया…

१० ऑगस्ट २०२५ पंचांग व राशिभविष्य (Today Horoscope In Marathi, 10 August 2025)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Dainik Rashi Bhavishya In Marathi)

घरगुती प्रश्न मिटतील. साधनेला चांगला काळ आहे. केवळ कामावर लक्ष केन्द्रित करावे. स्वत:वर ताबा ठेवावा. दिवस खेळीमेळीत जाईल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Dainik Rashi Bhavishya In Marathi)

कामे जलद गतीने उरकण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावा. चांगल्या गुंतवणुकीतून लाभाचे योग. व्यापारी वर्गाला दिवस लाभदायक असेल. एखादी चांगली बातमी मिळेल.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Dainik Rashi Bhavishya In Marathi)

तरुण मंडळींनी फार उतावीळपणा करू नये. बदल स्वीकारावा लागेल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. वाहन विषयक अडचण मिटेल. हातात काही अधिकार येतील.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Dainik Rashi Bhavishya In Marathi)

पारदर्शी व्यवहार करावेत. भावंडांना सहाय्य करावे लागेल. आज एखादी आठवण जागृत होईल. विरोधक नामोहरम होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Dainik Rashi Bhavishya In Marathi)

अतिविचार करू नका. नवे मनसुबे यश देतील. बोलण्यातून आत्मविश्वास प्रकट कराल. आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. मित्रांची उत्तम साथ लाभेल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Dainik Rashi Bhavishya In Marathi)

कलाकार मंडळींना वेगळा दर्जा मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील. झोपेची तक्रार जाणवेल. कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. घराबाहेर सावधानतेने वावरावे.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Dainik Rashi Bhavishya In Marathi)

महिला वर्ग खुश राहील. मनातील प्रबळ इच्छा पूर्ण होईल. टीमवर्क उपयोगाला येईल. नवीन विचार जाणून घेता येतील. शुभ वार्ता मिळतील.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Dainik Rashi Bhavishya In Marathi)

कामात अधिक उत्साह वाटेल. दिवसाची सुरुवात व्यस्त राहील. लाभाच्या अनेक संधी चालून येतील. मनातील चिंता दूर होईल.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Dainik Rashi Bhavishya In Marathi)

खाण्या-पिण्याचे पथ्ये पाळावीत. निर्णय उत्स्फूर्तपणे घेतले तर फळाला येतील. ज्येष्ठांशी सुसंवाद साधावा. सहकार्‍यांशी वाद घालू नये. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Dainik Rashi Bhavishya In Marathi)

जुने व्यवहार लाभ देतील. काळाची पाऊले ओळखावीत. घरगुती वादविवादात अडकू नका. कामातील प्राधान्य जाणून घ्यावे. धार्मिक कामात मन रमवाल.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Dainik Rashi Bhavishya In Marathi)

जोडीदाराची प्रगती होईल. चर्चेतून नवकल्पना सुचतील. करमणूक प्रधान गोष्टी कराल. भेटवस्तू देताना खर्चाचा विचार कराल. सहकार्‍यांना सोबत कराल.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Dainik Rashi Bhavishya In Marathi)

उत्साहाने कार्यरत राहाल. दिवसाची सुरुवात धीम्यागतीने होईल. समस्यांचे निराकरण होईल. कौटुंबिक वादात पडू नका. स्वभावात उधळेपणा येईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर