Dainik Rashi Bhavishya In Marathi , 11 May 2025 : ११ मे २०२५ रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. पौराणिक मान्यतेमध्ये असे म्हटले जाते की, भगवान विष्णूचा नरसिंह अवतार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला झाला होता. भगवान विष्णूचा नरसिंह अवतार खूप खास आहे. चतुर्दशी तिथी रविवारी रात्री ८ वाजून २ मिनिटांपर्यंत राहील. स्वाती नक्षत्र सोमवारी सकाळी ६ वाजून १७ मिनिटांपर्यंत जागृत असेल. त्यानंतर रात्री ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत रवी योग जुळून येईल. रात्री ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत चित्रा नक्षत्र जागृत असणार आहे आणि व्यतिपात योग जुळून येईल. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. आज भगवान नृसिंह तुम्हाला कसा देणार आशीर्वाद जाणून घेऊया…

आजचे राशिभविष्य, ११ मे २०२५ : (Aajche Rashi Bhavishya 11 May 2025 In Marathi)

मेष दैनिक राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)

मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे लागेल. श्रमातून कार्यसिद्धी होईल. मौल्यवान वस्तूंकडे आकर्षण वाढेल. काही बदलांना सामोरे जावे लागू शकते.

वृषभ दैनिक राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)

सामाजिक कामात सावधगिरी बाळगावी. सहकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल. कामात कसलीही हयगय करू नका. नोकरदारांना कामाचा ताण जाणवू शकतो. विलंबावर मात करावी लागेल.

मिथुन दैनिक राशिभविष्य (Gemini Daily Horoscope in Marathi)

प्रवासात अत्यंत सावधानता बाळगावी. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. निराशेच्या आहारी जाऊ नका. काही गोष्टी क्षणिक आनंद देऊन जातील. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

कर्क दैनिक राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)

कामाची योग्य पोचपावती मिळेल. उष्णतेचे विकार जाणवतील. मुलांची चिंता लागून राहील. शारीरिक कष्ट वाढू शकतात. कामातील निराशाजनक स्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा.

सिंह दैनिक राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)

कचेरीची कामे लांबणीवर पडू शकतात. व्यावसायिक अडचणी जाणून घ्याव्यात. जोडीदाराचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. अनपेक्षित गोष्टींचा फार विचार करू नका. भागीदाराच्या मताचा आदर करावा.

कन्या दैनिक राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)

कामाची फार चिंता करू नका. चोरांपासून सावध राहावे. जुगाराच्या मार्गाचा वापर करू नका. प्रेमप्रकरणातील कटुता टाळावी. वेळेचे महत्व लक्षात घ्यावे.

तूळ दैनिक राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)

मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. ऐनवेळेची धावपळ टाळण्याचा प्रयत्न करावा. जुगारापासून दूर राहावे. चैनीकडे अधिक कल राहील. आपलेच म्हणणे खरे कराल.

वृश्चिक दैनिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)

चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. शेअर्स मधून धनलाभाची शक्यता. घरगुती प्रश्न शांतपणे हाताळा. जोडीदाराच्या स्वभावाचा अचंबा वाटेल. मुलांची स्वतंत्र वृत्ती लक्षात घ्यावी.

धनू दैनिक राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathii)

कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. योग्य कार्यपद्धत वापराल. एकंदरीत कामाचा उरक वाढला जाईल. काही वेळेस नमते घ्यावे लागेल. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल.

मकर दैनिक राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)

मुलांच्या धडाडीचे कौतुक कराल. बौद्धिक दृष्टीकोनाची चुणूक दाखवाल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. जबाबदारी आनंदाने पार पाडाल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.

कुंभ दैनिक राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)

क्रोधावर नियंत्रण ठेवा. मन:शांती जपणे महत्त्वाचे आहे. घरगुती गोष्टींनादेखील प्राधान्याने विचारात घ्यावे. जवळच्या प्रवासाचा योग येईल. अती धाडस करू नका.

मीन दैनिक राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)

मदतीशिवाय कामे उरकती घ्याल. कर्तृत्वाने स्वत:चे महत्त्व पट‍वून द्याल. कौटुंबिक वातावरणात दिवस मजेत घालवाल. सारासार विचार करण्यात भर द्याल. नातेवाईकांना भेटण्याचा योग येईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर