आजचं राशीभविष्य, गुरूवार, ११ नोव्हेंबर २०२१

आजचं राशिभविष्यानुसार धनू राशीच्या व्यक्तींचे सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल. मनाप्रमाणे खरेदी करता येईल.

सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष:-

व्यावसायिक क्षेत्रात उत्तम काळ. मनात चांगले विचार घोळत राहतील. दिनक्रम व्यस्त राहू शकेल. कोणत्याही वादापासून दूर राहावे.  करियर मध्ये प्रगती करता येईल.

वृषभ:-

प्रवासाचे योग येतील. आहाराची पथ्ये पाळा. नवीन ओळख लाभदायक ठरेल. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर घरात चर्चा होईल. जोडीदाराची प्रगती होईल.

मिथुन:-

नवीन व्यवसायासाठी सुसंधी सापडेल. नोकरदार वर्गाने कामाकडे विशेष लक्ष द्यावे. पराक्रमात वृद्धी होऊ शकेल. हित शत्रूंपासून सावध राहावे. आरोग्यात सुधारणा होईल.

कर्क:-

व्यावसायिक क्षेत्रात चलती दिसून येईल. मध्यम फलदायी दिवस. भविष्यातील योजनांवर काम करणे आवश्यक. मित्रांसोबत काळ व्यतीत कराल. फाजील आत्मविश्वास टाळावा.

सिंह:-

नवीन कामासाठी प्रवृत्त व्हाल. दुसर्‍यांच्या मदतीला धावून जाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. हातातील कलेला योग्य दाद मिळेल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.

कन्या:-

व्यसनांना वेळीच आवर घाला. पैशाची उधळपट्टी होत नाही ना याची काळजी घ्या. उत्साहवर्धक दिवस असेल. बोलण्यातील माधुर्य जपाल. गायक मंडळींना चांगली प्रतिष्ठा लाभेल.

तूळ:-

सर्वांना गोडीने आपलेसे कराल. मित्रांशी पुन्हा नव्याने संबंध जुळतील. जोडीदाराशी नाते अधिक दृढ होईल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. आर्थिक पातळीवर दिवस चांगला जाईल.

वृश्चिक:-

जुनी उधारी वसूल होईल. दिवस चांगला जाईल. जवळचा प्रवास घडेल. व्यवसाय वाढीचे प्रयत्न यशस्वी होऊ लागतील. एखाद्या कामाला खीळ बसू शकते.

धनू:-

सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल. मनाप्रमाणे खरेदी करता येईल. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. अनावश्यक खर्च वाढू शकतो. कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी.

मकर:-

आवश्यक असेल तरच आपले मत मांडावे. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील. कामात जोडीदाराची साथ मिळेल. प्रवासात घाई करून चालणार नाही. आपल्या साठी काही वेळ राखून ठेवावा.

कुंभ:-

मानसिक संतुलन राखावे. नवीन कामात तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा. खर्चाचा पूर्ण अंदाज बांधावा. हातातील प्रकल्प पूर्णत्वास जाईल. चिकाटी सोडू नका.

मीन:-

घरात धार्मिक कार्य घडेल. प्रगतीचे नवे दार खुले होईल. भावंडांसोबत नातेसंबंध सुधारतील. व्यवसायात प्रतिष्ठा वाढीस लागेल. नव्या योजनेत गुंतवणूक कराल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आजचे भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Horoscope today 11 november 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr

Next Story
आजचे राशीभविष्य, सोमवार, ५ डिसेंबर २०१६Astrology, horoscope, आजचे राशीभविष्य
ताज्या बातम्या