Rashi Bhavishya In Marathi, 17 August 2025: आज १७ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. नवमी तिथी रात्री ९ वाजून ३४ मिनिटांपर्यंत असेल. आज रोहिणी नक्षत्र सकाळी ७ वाजून २४ मिनिटांपर्यंत जागृत असेल आणि सोमवार पर्यंत वाघ्यात योग जुळून येईल. आज राहू काळ ४:३० वाजता सुरु होईल ते ६ वाजेपर्यंत असणार आहे. तर रविवार तुमच्या राशीचा हसत-खेळत जाणार का चला जाणून घेऊया…
१७ ऑगस्ट २०२५ पंचांग व राशिभविष्य (Aajche Rashi Bhavishya In Marathi, 17 August 2025)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today in Marathi)
महिलांवरील कामाचा ताण वाढू शकतो. आरोग्याची नाहक चिंता कराल. मित्र परिवाराची उणीव जाणवेल. मनावर कसलाही ताण घेऊ नका. स्वच्छंदी विचार करावेत.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today in Marathi)
नवनवीन गोष्टी वाचनात येतील. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. जोडीदाराविषयी मनात संभ्रम निर्माण होईल. अपचनाचे विकार जाणवू शकतात. विवेकाने परिस्थिती हाताळावी.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today in Marathi)
पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. योग अथवा व्यायाम करण्यात आळस करू नका. नवीन विचार प्रेरणा देणारा असेल. प्रेमातील व्यक्तीसाठी उत्तम दिवस. आपला प्रभाव पाडण्यात यशस्वी व्हाल.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today in Marathi)
घरात कटू शब्द वापरू नका. शक्यतो घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. काही कामे लांबणीवर टाकली जाऊ शकतात. दिवस मध्यम फलदायी राहील. नसते साहस करायला जाऊ नका.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today in Marathi)
परिवारातील सदस्यांच्या गरजा समजून घ्या. संमिश्र घटना जाणवतील. नोकरदार वर्गाला कामाचा ताण जाणवेल. बौद्धिक थकवा जाणवू शकतो. ध्यानधारणा करावी.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today in Marathi)
तरुणांनी बेफिकिरीने वागू नये. सामाजिक बांधीलकी जपावी. काही वेळेस सबुरीने वागणे फायद्याचे ठरेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. लाभाच्या संधीकडे लक्ष ठेवावे.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today in Marathi)
कौटुंबिक वातावरण कलुषित होणार नाही याची काळजी घ्या. जोडीदाराकडून अपेक्षा राहतील. इतरांवर विसंबून राहू नका. कामाविषयी एक विशिष्ट धोरण ठरवा. भावंडांशी वादाचे प्रसंग टाळा.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today in Marathi)
मनात एक अनामिक भीती राहील. परंतु फार काळजी करण्याचे कारण नाही. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी अधिकाराने वागाल. एकांत हवाहवासा वाटेल.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today in Marathi)
महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावाल. विरोधक नरमाईने घेतील. मनातील काळजी दूर सारावी लागेल. इतरांना दोष देण्यापेक्षा स्वत: प्रयत्नशील राहावे. मुलांच्या वागण्याची चिंता वाटेल.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today in Marathi)
विचारतील कर्मठपणा बाजूला सारावा लागेल. घरात उगाचच चिडचिड करू नका. कोणाचीही नाराजी पत्करू नका. तुमच्या कामाची पावती मिळण्यास थोडा काळ लागेल. चिकाटी सोडून चालणार नाही.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today in Marathi)
कामात स्थिरता ठेवावी. अधिक उत्साहाने कामे हाताळाल. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. समोरील कामे प्राधान्याने करावीत. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today in Marathi)
खाण्या-पिण्याच्या सवयी बाबत आग्रही राहाल. आवडते छंद जोपासावेत. नकारात्मक विचार टाळावेत. ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहाल. वरिष्ठांचे कामात सहकार्य मिळेल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर