Daily Horoscope In Marathi 22 August 2025 : आज २२ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. चतुर्दशी तिथी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज आश्लेषा नक्षत्र रात्री १ वाजून १६ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. वारीयन योग दुपारी २ वाजून २४ मिनिटांपर्यंत जुळून येईल. आज अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ५८ मिनिटांनी होईल ते दुपारी १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत असेल. आज राहू काळ १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. आज माता लक्ष्मीच्या तुम्हाला कोणत्या रूपात आशीर्वाद मिळणार जाणून घेऊया…

२२ ऑगस्ट २०२५ पंचांग व राशिभविष्य (Horoscope Today In Marathi, 22 August 2025)

मेष आजचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)

कामातील उत्साह वाढीस लागेल. लहान-सहान गोष्टींवरून चिडू नका. बौद्धिक कामात अधिक कष्ट पडतील. घरातील गोष्टींबाबत अधिक दक्ष राहाल. आततायीपणे कोणतीही गोष्ट करू नका.

वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)

सामाजिक गोष्टींची जाणीव मनात जागृत ठेवायला हवी. जवळचे मित्र भेटतील. कामाच्या ठिकाणी सुलभता लाभेल. धडाडीपणावर संयम ठेवा. चर्चेला अधिक महत्त्व द्या.

मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)

गोड बोलण्यातून छाप पाडाल. कामातून अनपेक्षित लाभ मिळेल. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन कामाला निघावे. व्यापारी वर्गाला लाभ मिळतील. मित्रांशी सुसंवाद ठेवावा.

कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)

व्यावसायिक स्तरावरील बदल लक्षात घ्या. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. कष्ट अधिक वाढू शकतात. व्यापार्‍यांनी अधिक मेहनत घ्यावी. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या.

सिंह आजचे राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)

नवीन प्रयोगाला यश येईल. आपले मत अधिक स्पष्टपणे मांडाल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. वरिष्ठांना नाराज करू नका. त्यांचा दबदबा वाढेल.

कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)

कष्टाला पर्याय नाही. झोपेची तक्रार जाणवेल. मन काहीसे विचलीत राहील. मनातील इच्छा अधिक तीव्र होईल. महत्त्वाच्या नोंदी ठेवाव्यात.

तूळ आजचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)

नवीन विचार आत्मसात कराल. कलेला अधिक प्रोत्साहन मिळेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. मित्रांशी पैज लावाल.

वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)

कौटुंबिक वातावरण चांगले राहील. वक्तव्य विचारपूर्वक करावे. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल. विरोधक शांत राहतील. सरकारी कामे पुढे सरकतील.

धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathi)

जवळचा प्रवास करता येईल. भावंडांची मदत मिळेल. रागाला आवर घालावी लागेल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. मनापासून जबाबदार्‍या पार पाडाल.

मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)

दिवस शांततेत जाईल. विचारांना योग्य गती द्या. उत्साहवर्धक व सकारात्मक दिवस. आध्यात्मिक प्रगती कराल. जोडीदाराची योग्य साथ मिळेल.

कुंभ आजचे राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)

मनाची चंचलता जाणवेल. अचानक लाभाची शक्यता. हातातील कामात घाई करू नका. भौतिक सुखात वाढ होईल. स्थावरच्या व्यवहारातून लाभ होईल.

मीन आजचे राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)

मानसिक व्यग्रता जाणवेल. व्यावसायिक लाभावर लक्ष केन्द्रित करावे. अनाठायी खर्चाची शक्यता. प्रेमातील व्यक्तींनी आज सबुरी बाळगावी. राजकारणात पडू नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर