Vastu Tips For Money : कोणत्याही व्यक्तीला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्याची गरज असते. त्याप्रमाणे आता पैशांची गरज असते. कारण- पैशांशिवाय या गोष्टी खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे लोक हल्ली शांत व आनंदी जीवन जगण्यासाठी दिवस-रात्र कठोर परिश्रम करतात आणि पैसा कमवतात; परंतु अनेक वेळा खूप प्रयत्न करूनही कमावलेला पैसा हातात टिकत नाही. अशा वेळी आर्थिक अडचणींमुळे माणसाला आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पैशाशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सुचवfण्यात आले आहेत. हे नेमके काय उपाय आहेत ते जाणून घेऊ…
लॉकर या दिशेने ठेवा
वास्तुशास्त्रानुसार, जर पैसे तुमच्या हातात टिकत नसेल, तर सर्वप्रथम तुमच्या घराच्या पश्चिम-नैर्ऋत्य-पश्चिम दिशेने लॉकर किंवा पिगी बँक ठेवा आणि त्यात दररोज काही पैसे ठेवा. असे म्हटले जाते की, असे केल्याने पैसे घरात टिकू शकतो.
अंथरुणावर जेवण करू नका
वास्तुशास्त्रानुसार, अंथरुण किंवा पलंगावर बसून जेवण केल्याने घरात गरिबी येते. म्हणून घरात समृद्धी आणण्यासाठी, पलंगावर जेवण करणे थांबवावे आणि बेडरूममध्ये घाणेरडी भांडी ठेवू नयेत.
पैशाला थुंकी लावू नका
वास्तुशास्त्रानुसार, घरात आर्थिक समृद्धीसाठी नोटा मोजताना त्यावर थुंकी लावू नये. जेव्हा तुम्ही कोणाकडून पैसे घेता तेव्हा ते फक्त उजव्या हाताने घ्यावेत.
नोटा अशा धरू नका
वास्तुशास्त्रानुसार, पैशांचा अपमान कधीही करू नये. वास्तुशास्त्रानुसार, नोटा बोटांच्या कात्रीसारख्या स्थितीमध्ये धरू नयेत. असे केल्याने आर्थिक समस्या उद्भवू शकतात, असे म्हटले जाते.
झाडू लपवून ठेवा
वास्तुशास्त्रानुसार, झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. घरातील झाडू नेहमी लपवून ठेवावा. लक्षात ठेवा की, झाडू कधीही पैसे ठेवलेल्या ठिकाणी किंवा पूजास्थळी ठेवू नये.
मिठाशी संबंधित उपाय
वास्तुशास्त्रानुसार, आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला असलेल्या भांड्यात मीठ ठेवणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरात धनसंपत्ती टिकून राहते, असे मानले जाते.