Lucky Numbers as Per Birthdate: संख्याशास्त्रात विविध बाजूंचा विचार करताना भाग्यांकाचाही विचार करणे खूप आवश्यक आहे. भाग्यांक म्हणजे काय तर तुमच्या जन्मतारीख, जन्ममास व वर्ष यातील अंकांची बेरीज करून ० ते ९ मधील एक अंक मिळवणे. हा अंकच तुमचा भाग्यांक म्हणून ओळखला जातो. यानुसार तुमच्या व्यक्तिमत्वाचे भविष्याचे अनेक उलगडे तुम्ही स्वतः करू शकता. प्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक उल्हास गुप्ते यांच्याकडून आज आपण भाग्यांक २ असणाऱ्या मंडळींच्या स्वभाव वैशिष्ट्यांविषयी जाणून घेणार आहोत. ज्योतिषतज्ज्ञांच्या माहितीनुसार या भाग्यांकाने आनंदाशी आपले थेट नाते जोडलेले असते. असा सदा प्रसन्न स्वभाव असणाऱ्या मंडळींना आयुष्यात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी व कधी निश्चिन्त राहायला हवं हे पाहूया…
भाग्यांक २ असणाऱ्या लोकांचा स्वभाव कसा असतो?
उत्तम वक्तृत्व आणि बोलण्याची एक विशिष्ट लकब यातून या व्यक्ती समोरच्या व्यक्तीवर उत्तम छाप पाडतात. यांची नीटनेटके काम करण्याची पद्धत आणि उत्तम कामाचा उरक यातून हे उद्योग धंद्यात नोकरीत अडचणीच्या काळात सदैव पुढे असतात.
कुठल्याही विपरित प्रसंगात स्वत:ला सावरून सुरक्षित मार्ग काढण्याचे यांचे कसब फार वेगळे असते. या कारणाने या व्यक्ती समाजात अतिशय लोकप्रिय ठरतात. तसेच मित्रमंडळीच्या समुदायात मिळून मिसळून असतात. समूहापासून दूर असणे यांना बिलकूल जमत नाही. आपल्या आजूबाजूला चार माणसे असावीत यात हे मोठा आनंद मानतात.
अशा लोकांनी प्रेम प्रकरणात भावनावश होऊन आपले सर्वस्व उधळून लावण्याचा विचार कधीही करू नये. कारण यांच्या समोरील व्यक्तीला त्यात काही स्वारस्य नसते. हे मात्र त्या प्रेमाच्या भोवऱ्यात स्वत:ला फिरवत राहून आयुष्यात असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी गमावून बसतात. तेव्हा यांनी ही सावधानतेची सूचना जरूर पाळावी.
हे ही वाचा<< प्रेमात अतिहळवी व स्वभाव अतिलहरी; तुमचा भाग्यांक हाच आहे का? जन्मतारखेवरून जाणून घेऊ स्वभाव
यांच्या जन्मतारखेत मूलांक दोन किंवा सातची उपस्थिती असेल तर मनाचा गोंधळ अधिक वाढेल. तर मूलांक एकची उपस्थिती उत्तम शिस्त देईल. तसेच मूलांक नऊच्या सहवासामुळे क्रोधाचे प्रमाण वाढेल तर मूलांक तीनच्या सहवासातून यांच्या मनाचा समतोलपणा उत्तम जपला जाईल.
या लेखाच्या पुढील टप्प्यात आपण भाग्यांक ३ ते ९ विषयी सुद्धा जाणून घेणार आहोत. यासाठी लोकसत्तावरील राशीवृत्त या कॅटेगरीला भेट द्यायला विसरू नका.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)