Janmashtami 2025 Auspicious Yogas: श्रीकृष्ण जन्माष्टमी हा प्रत्येक कृष्णभक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी भक्तगण व्रत ठेवतात, शुभ मुहूर्तावर भगवान श्रीकृष्णाची विधीवत पूजा करतात आणि संपूर्ण दिवस भक्तिमय वातावरणात व्यतीत करतात. यंदा जन्माष्टमीचा पावन सण १६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होणार असून, ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अनेक दुर्मीळ योगांचा संगम होणार आहे. रात्री २ वाजेपर्यंत कर्क राशीत बुधादित्य योग निर्माण होणार आहे. त्याचबरोबर सकाळी ११ वाजून ४३ मिनिटांनी चंद्रदेव आपल्या उच्च राशीत म्हणजेच वृषभेत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, त्याच रात्री २ वाजता सूर्यदेव स्वतःच्या स्वराशीत प्रवेश करतील. याशिवाय सकाळी ७ वाजून २१ मिनिटांपर्यंत वृद्धी योग राहील आणि त्यानंतर ध्रुव योग लागू होईल. या शुभ योगांचा थेट परिणाम काही राशींवर दिसून येणार असून, त्या राशींना अपार लाभ मिळण्याची शक्यता आहे.
ग्रह-नक्षत्रांची अनोखी जुळवाजुळव, अनेक शुभ योगांची निर्मिती आणि श्रीकृष्णाची कृपा यांचा संगम होणार आहे. असे सांगितले जाते की या काळात काही भाग्यवान राशींवर पैशांचा अक्षरशः वर्षाव होईल, तर काहींना आयुष्यात सुख-समृद्धी आणि मान-सन्मान मिळणार आहे. दही-साखरेच्या प्रसादासोबत भाग्याचाही गोडवा अनुभवण्याची संधी कोणाला मिळणार? कुणाचं नशीब चमकणार आणि कुणाला होणार सोन्याहून पिवळा लाभ, पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
दही-साखरेच्या प्रसादासह खुलणार ‘या’ राशींचे भाग्य
कन्या (Virgo)
या वर्षीची जन्माष्टमी कन्या राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी घेऊन आली आहे. भगवान श्रीकृष्णाची तुमच्यावर विशेष कृपा राहणार आहे. हातातील कामांमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळू शकतात. व्यवसायात वाढ होईल, नवीन करार जुळतील आणि अचानक धनलाभाचे योग तयार होतील. प्रेमजीवनातही आनंदाची फुले उमलतील.
धनू (Sagittarius)
धनू राशीच्या लोकांसाठी हा दिवस करिअरमध्ये झेप घेणारा ठरणार आहे. जुनी अडलेली कामे मार्गी लागू शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. प्रतिष्ठा व मान-सन्मान वाढू शकतो. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठीही हा उत्तम काळ असेल.
कुंभ (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत उल्लेखनीय यश मिळू शकते. इच्छित नोकरीची संधी मिळू शकते. बढतीचेही योग आहेत. व्यवसायात मोठी डील फाइनल होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्पांना हिरवा कंदील मिळेल. नोकरी-व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. तसेच, धनसंपत्तीत वाढ होऊ शकते.
यंदाची जन्माष्टमी केवळ धार्मिक उत्सवापुरती मर्यादित नसून, या तीन राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडणारी ठरणार आहे. श्रीकृष्णाच्या कृपादृष्टीने तुमच्या जीवनात सुख, संपत्ती आणि समाधानाची भरभराट होऊ शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)