July Grah gochar 2024 : जुलै महिन्यात मंगळ, शुक्र, बुध आणि सूर्य गोचर दिसून येईल. ग्रह गोचरसाठी जुलै महिना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ग्रहाचे राशी परिवर्तन कोणत्या ना कोणत्या राशीसाठी महत्त्वाचे असते. प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो. ग्रहाचे राशी परिवर्तन काही राशींचे भाग्य बदलू शकतात. जुलै महिन्यात चार मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. हे चार ग्रह म्हणजे शुक्र, मंगळ, सूर्य आणि बुध. या ग्रहांचे गोचर काही राशींसाठी फायद्याचे ठरू शकते. हे ग्रह गोचर केव्हा होणार आणि कोणत्या राशींवर याचा परिणाम होईल, याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ या. (July Grah gochar 2024 these big grah gochar in jully month)
शुक्र गोचर
शुक्र ७ जुलै २०२४ रोजी सकाळी ४ वाजून ३९ मिनिटांनी कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्राला सौंदर्य, सुख संपत्तीचा कारक मानले जाते.
मंगल गोचर
मंगळ १२ जुलै २०२४ रोजी रात्री ७ वाजून १२ मिनिटांनी शुक्राची राशी वृषभमध्ये प्रवेश करणार आहे. मंगळाला धाडसी, पराक्रमाचा कारक मानले जातात.
सूर्य गोचर
ग्रहांचे राजा सूर्य १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजून २९ मिनिटांनी कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या दिवी कर्क संक्राती साजरी केली जाईल. या दिवसापासून सूर्य दक्षिणायन होणार.
बुध गोचर
बुध ग्रहाचे राशी परिवर्तन १९ जुलै रोजी रात्री ८ वाजून ४८ मिनिटांनी होणार. बुध ग्रह या दिवशी सिंह राशीमध्ये प्रवेश करणार.
शुक्र गोचर
जुलै महिन्यात शुक्र दुसऱ्यांदा ३१ जुलै २०२४ रोजी दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी राशी परिवर्तन करणार आहे.या दिवशी शुक्र सिंह राशीमध्ये येणार आहे. येथे आधीपासूनच बुध, सूर्य, आणि शुक्राची युती निर्माण होऊ लक्ष्मी नारायण योग तयार होईल.
जुलै महिन्यात मेष, मिथुन आणि सिंह राशीचे भाग्य चमकेल. या लोकांना भौतिक सुख सुविधा मिळेल. या लोकांना अचानक धनलाभ मिळू शकते. पैसे कमावण्याचे नवीन संधी मिळतील. कुटूंबात सुख शांती नांदेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)