सौभाग्य, संपत्ती, ज्ञान आणि मान-सन्मान यांचे अधिपती म्हणजेच देवतांचे गुरु बृहस्पती. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी गुरु आपल्या उच्च राशीत — कर्क राशीत — वक्री झाले आहेत आणि ११ मार्च २०२६ पर्यंत तिथेच विराजमान असणार आहे. या कालावधीत डिसेंबर महिन्यात ते काही काळासाठी मिथुन राशीतही प्रवेश करतील.
बृहस्पतींच्या कर्क राशीतील वक्री अवस्थेमुळे हंस राजयोग आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. जेव्हा शुभ ग्रह वक्री होतो तेव्हा तो उच्च ग्रहा इतका बलवान होतो. त्यामुळे या काळात काही राशींच्या लोकांना प्रचंड लाभ, कीर्ती आणि समृद्धी प्राप्त होऊ शकते. चला जाणून घेऊ या तीन भाग्यवान राशींचं भविष्य—
मीन राशी (Pisces Zodiac)- आत्मविश्लेषण, प्रगती आणि शुभ घटनांचा काळ
या राशीसाठी बृहस्पती दशम भावाचे (केंद्र भावाचे) स्वामी असून, पंचम भावात (त्रिकोण भावात) वक्री झाले आहेत. त्यामुळे केंद्र–त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. गुरु वक्री झाल्याने मीन राशीच्या लोकांना आत्मपरीक्षण आणि गूढ विचारांचा अनुभव येईल. जीवनात गती येईल पण परिणाम थोड्या विलंबाने मिळतील. कार्यक्षेत्रात मेहनतीचे फळ नक्की मिळेल, आर्थिक स्थिती स्थिर राहील. मात्र अनावश्यक खर्च टाळा.कुटुंबात शुभकार्याची चर्चा होईल आणि मानसिक स्थैर्य वाढेल. गुरु या राशीचे स्वामी ग्रह असल्याने या काळात आत्मबल आणि ज्ञान दोन्ही वाढणार आहे.
मेष राशी (Aries Zodiac) – अडथळे दूर, नवी सुरुवात आणि आध्यात्मिक उन्नती
मेष राशीच्या लोकांसाठी गुरुंचा वक्री होणं अत्यंत शुभ संकेत देत आहे. केंद्र त्रिकोण राजयोगाच्या प्रभावामुळे तुम्ही आत्मचिंतन आणि पुनर्विचाराच्या टप्प्यातून जाणार आहात. ज्या कामांमध्ये अडथळे येत होते, ती कामं आता पुढे सरकतील. कामाच्या ठिकाणी नव्या योजना तयार होतील, आणि जुन्या निर्णयांवर पुन्हा एकदा विचार करण्याची संधी मिळेल. जर तुम्ही गुंतवणूक किंवा व्यवसायाशी संबंधित काही योजना राबवत असाल, तर त्याचा पुनर्मूल्यांकन तुम्हाला फायदा देईल. कुटुंबात सौहार्द वाढेल पण वाणीतील संयम आवश्यक आहे. शिक्षण आणि करिअरमध्ये बदल शोधणाऱ्यांसाठी हा काळ आत्मविश्वास आणि स्पष्टता देणारा ठरेल. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन वाढेल – गुरुचा हा काळ अंतर्मनाला बळ देणारा ठरेल.
कर्क राशी (Cancer Zodiac) – भाग्य उजळणार, पदोन्नती होणार आणि संपत्ती वाढणार
कर्क राशीत गुरु स्वतःच्या उच्च राशीत वक्री झाले आहेत आणि याच राशीत केंद्र–त्रिकोण राजयोग तयार होत आहे. या शुभ योगामुळे लोकांना जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगती आणि लाभाचे संकेत मिळतील. नोकरीत पदोन्नती, उत्पन्नात वाढ, आणि धन संचयाच्या संधी मिळतील.विरोधकांवर विजय मिळेल आणि भाग्य तुमच्या बाजूने असेल. मात्र थोड्या काळासाठी ताण येईल किंवा मतभेद होऊ शकतात पण संयम ठेवल्यास परिस्थिती पूर्णतः तुमच्या नियंत्रणात राहील. गुरु या राशीत अत्यंत बलवान असल्याने हा काळ भाग्याची वृद्धी, आत्मविश्लेषण आणि कर्मसुधारणा करण्यासाठी उत्तम मानला जातो.
गुरुंच्या वक्री अवस्थेत तयार झालेला केंद्र–त्रिकोण राजयोग म्हणजे नशिबाचं दार उघडण्याची वेळ. मीन, मेष आणि कर्क राशींच्या लोकांसाठी हा काळ प्रत्याशित लाभ, यश, आणि अंतर्मनातील जागृतीचा असेल. गुरुंचा आशीर्वाद योग्य कर्म करणाऱ्यांवर नक्कीच राहील — कर्म करा, गुरु कृपा आपोआप लाभेल!
