Guru Gochar 2026: १८ ऑक्टोबर रोजी गुरूने कर्क राशीत प्रवेश केला आणि आता ५ डिसेंबर रोजी मिथुन राशीत जाणार आहे. त्यानंतर २ जून २०२६पर्यंत गुरू मिथुन राशीत भ्रमण करेल.

२०२६मध्ये २ जून रोजी कर्क राशीत परत जाण्यापूर्वी गुरू ग्रह या पाच राशींवर अविश्वसनीयरित्या कृपा करेल. जानेवारी २०२६ ते जून २०२६च्या सुरूवातीपर्यंत ज्ञान, गुरू, संपत्ती, कीर्ती आणि आनंदाचा ग्रह असलेल्या गुरू ग्रहाचा आशीर्वाद कोणत्या पाच राशींवर राहील ते जाणून घेऊ…

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांचे उत्पन्न गुरू ग्रह वाढवेल. २०२६मध्ये त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही बचत कराल आणि गुंतवणूक कराल. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे पूर्ण होतील. एखाद्या महत्त्वाच्या कामाच्या पूर्ततेमुळे तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळेल. तुमची लोकप्रियता आणि आदर वाढेल.

मिथुन राशी

मिथुन राशीतील गुरू ग्रह त्यांना सौभाग्य देईल. तुमचे स्थान आणि प्रभाव वाढेल. तुम्हाला सुरक्षित आणि भाग्यवान वाटेल. आर्थिक लाभ शक्य होईल. तुम्हाला दीर्घकाळापासून रखडलेली बढती मिळू शकेल. नवीन संधी निर्माण होतील.

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी देईल. उद्योजक त्यांचे व्यवसाय वाढवू शकतील. जीवनात संपत्ती आणि समृद्धी वाढेल. विलास आणि सुख वाढेल. तसंच आदर आणि सन्मान वाढेल.

वृश्चिक राशी

२०२६च्या सुरूवातीच्या महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडून येऊ शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. खर्च मोठे असले तरी आर्थिक परिस्थिती ढासळणार नाही. बजेट राखल्याने तुम्हाला पैसे वाचण्यास मदत होईल. तुमच्या कुटुंबात आनंद राहील. तुम्हाला करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते.

कुंभ राशी

२०२६मध्ये कुंभ राशीच्या लोकांना गुरूच्या सकारात्मक प्रभावाचा फायदा होईल. आर्थिक प्रगती शक्य होईल. त्यांना जीवनात आनंद आणि शांती मिळेल. दिवस आरामात जातील. भौतिक सुखसोयी वाढतील. नवीन योजनांवर काम करून व्यावसायिकांना नफा मिळू शकेल.