Guru Gochar 2025 Jupiter Planet Transit in Mithun:  ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या आयुष्यातील घडामोडींवर ग्रह ताऱ्यांचा परिणाम होत असतो. जेव्हा एक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणाम दिसून येतात. त्याचा काही राशींवर चांगला परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रहाला ज्ञान, बुद्धी, धर्म, संपत्ती, अध्यात्म, शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये गोचर फार महत्त्वाचं समजलं जातं. ग्रहांच्या राशी परिवर्तनाला गोचर म्हणतात. सुख, संपत्ती, वैभव, ऐषोराम आणि ऐश्वर्याचा कारक असलेल्या गुरुचा राशी बदल अनेकार्थांनी महत्त्वाचा ठरतो. आता ज्योतिषशास्त्रानुसार, तब्बल १३ महिन्यांनंतर देवगुरू आपली राशी बदलणार आहेत. देवगुरू १४ मे रोजी रात्री ११.२० वाजता मिथुन राशीत संक्रमण करतील, त्यामुळे काही राशींसाठी सुखद काळ सुरू होऊ शकतो. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी सुवर्णकाळ सुरू होणार आहे…

गुरु ग्रहाच्या गोचरमुळे ‘या’ राशींना होणार फायदा?

वृषभ

गुरु ग्रहाच्या गोचरमुळे वृषभ राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. या काळात तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गातील लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीच्या संदर्भात तुम्ही काही महत्त्वाचे निर्णयदेखील घेऊ शकता. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली असू शकते. तसेच, या काळात समाजात तुमचा मान-सन्मानदेखील वाढू शकतो.

मिथुन

गुरु ग्रहाने राशीत केलेला बदल मिथुन राशीच्या लोकांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. तुम्ही अनेक क्षेत्रांत यश मिळवू शकता. उच्च शिक्षणासाठी इच्छुक लोकांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. तुमचे काम पाहून उच्च अधिकारी तुम्हाला बढती, पदोन्नती किंवा काही मोठी जबाबदारी देऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो.

तूळ

तूळ राशीच्या लोकांना देवगुरुच्या कृपेने कामात यश मिळू शकते. करिअरमध्येही मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमची रखडलेली कामं मार्गी लागू शकतात. या काळात तुम्ही भरपूर पैसे कमावण्यात यशस्वी होऊ शकता. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)