Horoscope Today 21 July 2025 In Marathi : आज २१ जुलै २०२५ रोजी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे. एकादशी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांपर्यंत असेल आणि त्यानंतर द्वादशी तिथी सुरु होईल. संध्याकाळी ७ वाजून ३९ मिनिटांपर्यंत वृद्धि योग जुळून येईल. रात्री ९ वाजून ७ मिनिटांपर्यंत रोहिणी नक्षत्र जागृत असणार आहे. तसेच आज कामिका एकादशी असणार आहे. आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. त्यानंतर येणारी कामिका एकादशी महत्त्वाची मानली जाते. तर आजची एकादशी तुमच्यासाठी कोणता संदेश घेऊन येत आहे चला जाणून घेऊ…

२१ जुलै २०२५ पंचांग व राशिभविष्य (Today Horoscope In Marathi, 21 July 2025)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

मानसिक ताण जाणवेल. अति विचार करू नका. आवडते पदार्थ चाखाल. स्वत:ला नियमांमध्ये बांधून घेऊ नका. कौटुंबिक वातावरण आनंदित राहील.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

गैरसमजाला मनात थारा देऊ नका. खाण्या पिण्यावर ताबा ठेवा. महत्त्वाच्या निर्णयाचा पुनर्विचार करा. कागदपत्रांची योग्य रीतीने छाननी करा. मित्रांशी मतभेदाची शक्यता.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

मन:शांती मिळवण्याचा प्रयत्न कराल. कामे ठरवल्याप्रमाणे पार पडतील. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. आपले मत उत्तम प्रकारे मांडावे. जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

मुलांविषयी चिंता वाटू शकते. कामात स्त्रियांचा हातभार लागू शकतो. नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

कौटुंबिक शांतता जपावी. घरगुती खर्चाचा जमाखर्च तपासा. तुमच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल. दांपत्य जीवन सुखकारक राहील. झोपेची तक्रार जाणवेल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

महत्त्वाची कामे आधी मार्गी लावावीत. टीका सहन करावी लागू शकते. मतभेदापासून चार पाऊले दूर रहा. वरिष्ठांची भेट घेता येईल. बोलण्यावर व रागावर नियंत्रण ठेवा.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

भावनिक अस्थिरता जाणवेल. आर्थिक व्यवहारात स्वच्छपणा ठेवावा. मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधाल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

भूतकाळातील गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. कर्जाची प्रकरणे त्रासदायक ठरू शकतील. मुलांचे विचार स्व‍च्छंदी वाटतील. जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदाराचे विचार जाणून घ्याल.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

नवीन कामाबद्दल सजग रहा. मानसिक चिंता सतावेल. क्षुल्लक गोष्टींची फार काळजी करू नका. चर्चेतून मार्ग काढावा. दुचाकी वाहन सावधपणे चालवावे.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

शांततेचा मार्ग स्वीकारावा. जुन्या गोष्टींचा त्रास करून घेऊ नये. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. प्रेमप्रकरणात सावधानतेने पावले उचलावीत. बाह्य गोष्टींची माहिती करून घ्यावी.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

भडक प्रतिक्रिया देणे टाळावे. विनाकारण चिंता करत बसू नका. स्वभावातील विनम्रता कायम ठेवा. अनाठायी खर्च वाढवू नका. शिस्तीचा फार बडगा करू नका.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

चांगल्या संधीच्या शोधत रहा. सकारात्मक उर्जेने कामे कराल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. क्षुल्लक गोष्टींवर राग राग करू नका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर