Aajche Rashi Bhavishya 16 July 2025 In Marathi : आज १६ जुलै २०२५ रोजी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथी रात्री ९ वाजून १ मिनिटांपर्यंत असणार आहे. सकाळी ११ वाजून ५६ मिनिटांपर्यंत शोभन योग जुळून येईल. उद्या सकाळपर्यंत म्हणजेच ५ वाजून ४७ मिनिटांपर्यंत उत्तर भाद्रपदा नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ ३ मिनिटांनी सुरु होईल ते ४:३० वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज कर्क संक्रांती असणार आहे. आज सूर्य देव मिथुन राशी सोडून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. यालाच कर्क संक्रांती असे म्हणतात. कर्क संक्रांतीला तुमच्या आयुष्यात साकारात्मतक बदल होणार का जाणून घेऊया…
१६ जुलै २०२५ पंचांग व राशिभविष्य ( Rashi Bhavishya In Marathi, 16 July 2025)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)
कुटुंबाच्या बाबतीत सौख्य जाणवेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. मित्रांच्या गराड्यात राहण्याची इच्छा होईल. वरिष्ठांकडून सहकार्याची फार अपेक्षा ठेऊ नये. आपला ठसा उमटवण्याची संधी मिळेल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)
व्यवहारी दृष्टीकोनातून विचार कराल. कौटुंबिक गैरसमज टाळावेत. मानसिक चांचल्य जाणवेल. व्यवसायातून चांगली कमाई होईल. वसुलीत आनिश्चितता जाणवेल.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)
बौद्धिक कामात सावध राहावे. मोहाला बळी पडू नका. निर्णयात इतरांवर विसंबून राहू नका. व्यावसायिक आघाडीवर सतर्क रहा. वरिष्ठांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)
कार्यकालीन स्थितीवर लक्ष द्यावे. भावनाविवश होऊन विचार करू नका. मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. थोडे अधिक श्रम घ्यावे लागू शकतात. दिवस कामात व्यतीत होईल.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)
घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. अधिकार्यांना नाराज करू नका. जोडीदाराचा राग समजून घ्यावा लागेल. भागीदाराशी मतभेदाची शक्यता. कामाशिवाय इतर गोष्टी टाळाव्यात.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)
दृष्टीकोन बदलून पहावा लागेल. हातातील संधी जाऊ देऊ नका. अपचनाचा त्रास जाणवेल. माहितीच्या आधाराने कामात यश येईल. संपर्कात वाढ होऊ शकेल.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)
जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. प्रेम प्रसंगात सावधानता बाळगा. आपल्यातील स्वाभाविक दोष टाळता आले तर पहावे. वरिष्ठांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करावे. अचानक धनलाभाची शक्यता.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)
व्यावसायिक कामातून मानसिक शांतता लाभेल. व्यक्तिगत छंद जोपासावेत. क्रोधाची भावना उचंबळू देऊ नका. क्षुल्लक चुका टाळण्याचा प्रयत्न करावा. अतिरिक्त खर्च टाळावा.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)
आवक मर्यादित राहील. आर्थिक देवाणघेवाण करतांना सावध रहा. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करावा.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)
कामाचा जोम अधिक वाढेल. कुटुंबात तुमचा दरारा राहील. विचारांच्या गतीला आवर घालावी लागेल. सढळ हस्ते खर्च केला जाईल. परिस्थितीचा योग्य अंदाज बांधावा.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)
भावंडांकडून चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करता येईल. व्यवसायात नवीन योजना आखाव्यात. कुटुंबियांशी वाद घालू नका. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)
अचानक नवीन खर्च समोर येऊ शकतात. जोडीदाराच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे. कौटुंबिक कामासाठी अधिक वेळ द्याल. सामाजिक गोष्टींचे भान राखून वागाल. आध्यात्मिक कामातून मनाला शांतता लाभेल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर