Vastu Tips For Kitchen : स्वयंपाकघर हा आपल्या घरातील एक महत्त्वाचा भाग आहे. कारण- ही अशी एक जागा आहे, जिथे अन्न शिजवले जाते आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती त्या जागेत एकत्र बसून जेवणाचा आनंद घेते. त्यामुळे वास्तुशास्त्रात स्वयंपाकघर हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रातील नियमानुसार, स्वयंपाकघरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो. त्यातील काही वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पण, नेमक्या कोणत्या वस्तू स्वयंपाकघरात ठेवू नयेत ते जाणून घ्या….
वास्तुशास्त्रातील नियमानुसार, स्वयंपाकघरात ‘या’ ५ गोष्टी ठेवणं टाळा
१) शिळे किंवा कुलजेले अन्न
वास्तुशास्त्रातील नियमानुसार, शिळे किंवा उरलेले अन्नपदार्थ स्वयंपाकघरात जास्त दिवस ठेवू नयेत. असे मानले जाते की, असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वास्तुदोष निर्माण होतात.
२) कचरा
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात कचरा ठेवणे हेदेखील अशुभ आहे. कारण- स्वयंपाकघरात ठेवलेला कचरा हा नकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानला जातो. त्यामुळे आर्थिक नुकसान होते. कुटुंबातील लोकांना आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. म्हणून स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे आणि कचरा नियमितपणे बाहेर फेकून द्यावा.
३) फुटलेली भांडी
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात फुटलेली भांडी ठेवणे अशुभ आहे. फुटलेली भांडी ही नकारात्मक ऊर्जेची प्रतीक मानली जातात. मग ही नकारात्मक ऊर्जा घरात पसरते आणि गरिबीला आकर्षित करते.
४) रिकामे डबे
स्वयंपाकघरात कधीही रिकामे डबे ठेवू नका. ते नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.
५) तीक्ष्ण, टोकदार वस्तू
स्वयंपाकघरात चाकू, कात्री इत्यादी तीक्ष्ण वस्तू नेहमी झाकून ठेवाव्यात. या वस्तू उघड्यावर ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि आर्थिक नुकसान होते.