Krishna Janmashtami 2024 Date Shubh Muhurat: हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप पवित्र मानले जाते. तसेच इतर महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात. श्रावणाला सुरुवात झाली की सर्वात आधी नागपंचमी आणि रक्षाबंधन आणि मग कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्वपूर्ण मानले जाते. कारण, या दिवशी श्री विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळेच श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो. यंदा २६ ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाईल. तसेच या दिवशी योगायोगाने श्रावणातला चौथा सोमवारदेखील असणार आहे.

कृष्ण जन्माष्टमी तिथी (Krishna Janmashtami Tithi)

कृष्ण जन्माष्टमी : सोमवार, २६ ऑगस्ट २०२४
अष्टमी तिथी प्रारंभ : २६ ऑगस्ट २०२४ , पहाटे ०३:३९ पासून
अष्टमी तिथी समाप्ती : २७ ऑगस्ट २०२४ , मध्यरात्री ०२:१९ पर्यंत
दही हंडी : मंगळवार, २७ ऑगस्ट २०२४ रोजी साजरी केली जाईल.

कृष्ण जन्माष्टमी शुभ मुहूर्त

कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचे शुभ मुहूर्त २६ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री १२ वाजून १ मिनिटांपासून १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत असेल. या ४४ मिनिटांच्या कालावधीत कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा: १६ ऑगस्टपासून नुसता पैसाच पैसा; सूर्याच्या मघा नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींच्या मान-सन्मात अन् संपत्तीत वाढ

कृष्ण जन्माष्टमीला अशी केली जाते पूजा

  • या काळात अनेक मंदिरांमध्ये किंवा घरांमध्ये कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते.
  • सर्वात आधी श्रीकृष्णांच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक आणि नंतर जलाभिषेक केला जातो. अभिषेक करताना कृष्णाच्या मंत्राचा जप केला जातो.
  • जलाभिषेक पूर्ण झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून पाळण्यात ठेऊन सुंदर वस्त्र, अलंकार घालून त्यांना सजवले जाते आणि नंतर त्यांना गंध, अत्तर , पुष्प, धूप, दीप, तुळस अर्पण केले जाते.
  • श्रीकृष्णांना पाळण्यात घालून भजन म्हटले जाते. तसेच आरती करून त्यांच्या स्तोत्र आणि मंत्रांचा जप केला जातो; लाडवाचा नैवेद्य त्यांना अर्पण केला जाते.