Lakshmi Narayan Raj Yog In Makar: ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह नक्षत्र एका निश्चित कालावधीनंतर आपले स्थान बदलून गोचर करत असतात. यामुळे अनेक शुभ अशुभ योग तयार होत असतात ज्याचा प्रभाव थेट मानवी जीवनावर दिसून येतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार येत्या २८ डिसेंबरला बुध ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे तर २९ डिसेंबरला शुक्र ग्रह मकर राशीत परिवर्तन करणार आहे. या दोन ग्रहांच्या युतीने लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. लक्ष्मी नारायण राजयोग हा अत्यंत शुभ मानला जातो परिणामी सर्वच राशींवर याचा सकारात्मक प्रभाव दिसून येऊ शकतो. मात्र तीन अशा राशी आहेत ज्यांना लक्ष्मी नारायण राजयोगाचा सर्वाधिक लाभ होऊ शकतो. या ३ राशींना यशप्राप्तीचे प्रबळ योग आहेत. या राशी कोणत्या चला तर जाणून घेऊयात..

लक्ष्मी नारायण राजयोग देणार ‘या’ राशींना अपार श्रीमंतीची संधी

मकर:

लक्ष्मी नारायण राजयोग हा मकर राशीसाठी सर्वात लाभदायक असू शकतो. बुध व शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे मकर राशीच्या प्रभाव कक्षेत नवव्या स्थानी हा राजयोग निर्माण होत आहे. हे स्थान भाग्य व परदेश वारीशी संबंधित आहे. पुढील काही महिन्यात आपल्याला नशिबाची साथ लाभण्याची चिन्हे आहेत. आपली जी कामे प्रलंबित होती ती या काळात मार्गी लागतील. तसेच तुम्ही ज्या कामाची सुरुवात कराल त्यात यश लाभण्याची संधी आहे. तुम्हाला शिक्षण किंवा कामाच्या निमित्ताने परदेशात होण्याची संधी आहे.

धनु:

लक्ष्मी नारायण राजयोग धनु राशीच्या भाग्यात सुवर्णकाळ सुरु करणार आहे. आपल्या राशीच्या प्रभाव कक्षेत हा राजयोग दुसऱ्याच स्थानी तयार होत आहे. हे स्थान धन व वाणीचे स्थान म्हणून ओळखले जाते. या काळात तुम्हाला अडकून पडलेले, उधार दिलेले पैसे पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. जे लोक शेअर बाजाराशी संबंधित काम करतात त्यांना विशेष लाभाची संधी आहे. या काळात मीडिया, मार्केटिंग क्षेत्रातील मंडळींना सुद्धा शुभ लाभाची चिन्हे आहेत. तुम्हाला जोडीदाराकडून धनलाभ होण्याची शक्यता अधिक आहे.

हे ही वाचा<< शिवामृत राजयोग बनल्याने २१ दिवसांनी ‘या’ ३ राशी होणार श्रीमंत? १ जानेवारी पासून प्रचंड धनलाभाची संधी

मीन:

लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने मीन राशीत अचानक धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. हा योग आपल्या राशीच्या प्रभावकक्षेत ११ व्या स्थानी तयार होत आहे. हे स्थान धन व लाभ यांच्याशी संबंधित आहे. येत्या काळात तुम्हाला मेहनतीचे फळ मिळणार आहे. ज्या कामासाठी तुम्ही आतापर्यंत प्रयत्न करत होतात त्या तुमच्या मेहनतीचे गोड फळ मिळण्याचा हा काळ असणार आहे. तुम्हाला नव्या नोकरीची संधी लाभण्याचा हा काळ आहे. ज्याची तुम्ही वाट पाहात होतात ते सगळं काही येत्या काळात शक्य होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)