Laxmi Narayan Yog: ज्योतिष शास्त्रात सर्व ९ ग्रहांचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. वेळोवेळी सर्व ग्रह राशी बदलण्याबरोबरच एका किंवा दुसर्‍या राशीतील इतर ग्रहांशी युती घडवतात. या ग्रहांच्या युतीचा थेट परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. अशा दोन ग्रहांची युती या महिन्यात होणार आहे.

१३ जुलै २०२२ रोजी बुध आणि शुक्र या ग्रहांची युती होणार आहे. खरं तर १३ जुलै रोजी सुखाचा दाता शुक्र मिथुन राशीत प्रवेश करेल. या दिवशी शुक्राने सकाळी १०:४१ वाजता मिथुन राशीत प्रवेश केला आहे. येथे बुध ग्रह आधीच विराजमान आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीमध्ये शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग तयार होईल. १३ जुलै ते १६ जुलै दरम्यान हा योग असेल. लक्ष्मी नारायण योग केव्हा तयार होतो आणि त्याचा राशींवर काय परिणाम होतो, हे जाणून घ्या…

आणखी वाचा : आज रात्री दिसणार चंद्राचा अनोखा अवतार, वर्षातील सर्वात मोठा Super Moon 2022

लक्ष्मी नारायण योग कधी तयार होतो?
लक्ष्मी नारायण योग हा अतिशय शुभ योग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत स्थित बुध आणि शुक्र या ग्रहांच्या युतीने लक्ष्मी नारायण योग तयार होतो. बुध हा बुद्धिमत्ता आणि विनोदाचा कारक मानला जातो. दुसरीकडे शुक्र सौंदर्य आणि आनंदाचे कारण आहे. या दोन ग्रहांच्या युतीमुळे व्यक्तींमध्ये रोमँटिक आणि कलात्मक प्रवृत्ती निर्माण होते.

शुक्र देखील सुखाचा दाता आहे. अशा परिस्थितीत हा योग सुख आणि सौभाग्य वाढवणारा योग आहे. ज्योतिष शास्त्रानुसार लक्ष्मी नारायण योगावर गुरुची दृष्टी निर्माण झाली तर सोन्याहूनही पिवळं अशी परिस्थिती निर्माण होते. त्याचबरोबर पाचव्या, नवव्या घरात शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे तयार झालेल्या लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावामुळे व्यक्ती काही विशिष्ट कलेत पारंगत होते. पाचव्या घरात तयार झालेल्या लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावामुळे व्यक्ती विद्वानही असते.

आणखी वाचा : २४ तासानंतर शनिदेवाचा प्रिय राशीत प्रवेश, या ३ राशींना अचानक होणार आर्थिक लाभ

असं म्हटलं जातं की, कुंडलीमध्ये लक्ष्मी नारायण योग असलेल्या व्यक्ती प्रतिभावान असतात. त्याचबरोबर जेव्हा जन्म राशीच्या पाचव्या घरात हा योग तयार होतो तेव्हा व्यक्तीला विशेष फळ मिळते. हा योग शिक्षण आणि ज्ञानाच्या बाबतीत विशेष यश देतो. ज्योतिष शास्त्रानुसार असे लोक आपल्या कर्तृत्वाने देशात आणि जगात प्रसिद्धी मिळवतात.

ज्योतिषशास्त्रानुसार बुध आणि शुक्र युती असेल तर त्यांचा प्रभाव अधिक शुभ होतो. मेष, धनु, मीन राशीच्या लोकांसाठी हा योग फारसा फलदायी नसतो, तर वृषभ, मिथुन, कन्या, तूळ राशीच्या लोकांसाठी हा योग विशेष परिणाम देतो, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते.