Maa Laxmi Favorite Zodiac Sign: धन, संपत्ती,पैसा म्हणजे लक्ष्मी होय. हिंदू धर्मात माता लक्ष्मीची संपत्ती-धन-ऐश्वर्याची देवी म्हणून पूजन केले जाते. प्रत्येकाचा प्रयत्न असतो की लक्ष्मी कायम आपल्यासोबत राहावी. लक्ष्मीची कृपा आपल्यावर असेल, तर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींना सहज तोंड देता येईल. धार्मिक मान्यतेनुसार, जिथे सुख-शांती नांदते, जिथे घरातल्या महिलांना योग्य सन्मान मिळतो, ज्या ठिकाणी साफसफाई असते, त्याठिकाणी देवी लक्ष्मीचा वास असतो. असे म्हणतात की, देवी लक्ष्मीची ज्याच्यावर कृपा असते, त्याला धन-वैभव-समृद्धी लाभते आणि तो व्यक्ती श्रीमंत असतो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य, आराम आणि आदर हवा असतो आणि या सर्व गोष्टींची प्राप्ती तेव्हाच शक्य होते जेव्हा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. काही राशी अशा आहेत की देवी लक्ष्मी, धनाची देवी, विशेषत: तिच्या आशीर्वादाचा वर्षाव त्या लोकांवर करीत असते. त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत ते पाहूया.
देवी लक्ष्मीच्या ‘या’ आहेत प्रिय राशी
वृषभ
वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. या लोकांच्या घरात पैशाचा प्रवाह सतत चालू राहतो. हे लोक कठोर परिश्रम आणि समर्पणाने काम करतात, ज्यामुळे त्यांना प्रत्येक वळणावर आर्थिक यश मिळते. देवी लक्ष्मी वृषभ राशीच्या लोकांवर विशेष दयाळू असते. हे लोक विलासी जीवनाचा आनंद घेतात आणि भरपूर संपत्तीचे मालक बनतात. या राशीचे लोक मेहनती आणि बुद्धिमान असतात आणि ते भाग्यवान देखील असतात.
कर्क
कर्क राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीचा नेहमी आशीर्वाद राहतो. हे लोक खूप संवेदनशील आणि कुटुंबासाठी समर्पित असतात, अशा परिस्थितीत देवी लक्ष्मी त्यांच्या या भावनेने प्रसन्न होते आणि नेहमीच तिच्या आशीर्वादांचा वर्षाव करते. हे लोक मेहनती असतात आणि प्रामाणिकपणे पैसे कमविण्यावर विश्वास ठेवतात. अशा परिस्थितीत, त्यांच्या कमावलेल्या पैशाने घरात येणारे सुख आणि समृद्धी दीर्घकाळ टिकते. देवी लक्ष्मीच्या कृपेने त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
तूळ
तूळ राशीचा स्वामी ग्रह देखील शुक्र आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने, हे लोक आयुष्यात भरपूर पैसे कमवतात आणि त्यांच्या करिअरमध्ये सतत प्रगती करून त्यांची संपत्ती वाढवत राहतात. तूळ राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते आणि लोक त्यांच्यावर सहज प्रभावित होतात. या लोकांना नेहमी महागड्या वस्तू आवडतात आणि लक्झरी लाइफ एन्जॉय करतात. देवी लक्ष्मीच्या कृपेने त्यांना अपार संपत्ती आणि जीवनातील सर्व सुख-सुविधा प्राप्त होतात. ते जीवनात खूप यशस्वी होतात.
धनू
धनू राशीच्या लोकांवर नेहमीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. हे लोक खूप धाडसी आणि आत्मविश्वासाने भरलेले असतात. माता लक्ष्मीच्या विशेष आशीर्वादामुळे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. या लोकांचा व्यवसाय वेगाने वाढतो. सकारात्मक दृष्टिकोनासोबतच, हे लोक खूप मेहनती असतात. त्यांना समृद्धी आणि यश मिळत राहते. महालक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
मीन
मीन राशीच्या लोकांवर नेहमीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. या राशीचे लोक खूप दयाळू आणि सहनशील असतात आणि त्यांच्या या स्वभावामुळे, या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा राहते. त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीच्या जोरावर यश मिळते. त्यांना नशीबाची साथही मिळते आणि त्यामुळे त्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण होतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)