Budhaditya and Malavya Yog: ज्योतिषशास्त्रानुसार काही ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतात. ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. पंचांगानुसार, येत्या सप्टेंबर महिन्यात शुक्र आपली स्वराशी असलेल्या तूळ राशीमध्ये प्रवेश करणार असून यामुळे मालव्य राजयोग निर्माण होईल. तसेच बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य राजयोगही निर्माण होईल. या दोन्ही राजयोगाचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.
मालव्य आणि बुधादित्य राजयोग तीन राशींना करणार मालामाल
तूळ (Tula Rashi)
मालव्य आणि बुधादित्य राजयोग तूळ राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात आयुष्यात काही सकारात्मक बदल होतील. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. समाजात मान-सन्मान वाढेल.
मकर (Makar Rashi)
मालव्य आणि बुधादित्य राजयोग मकर राशीसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात अनेक समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. तूळ राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल.
कुंभ (Kumbha Rashi)
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी बुधादित्य आणि मालव्य राजयोग खूप सकारात्मक सिद्ध होईल. मेहनत केलेल्या कामात हवे तसे यश मिळविता येईल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. करिअर आणि व्यवसायात मानासारखे यश प्रस्थापित कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)