Mangal and Ketu Yuti 2025 Visfotak Yog Impact in Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी बदल करतात आणि शुभ आणि अशुभ योग निर्माण करतात, ज्याचा मानवी जीवनावर तसेच देश आणि जगावर परिणाम होतो. ७ जून रोजी मंगळ सिंह राशीत प्रवेश करेल, जिथे केतू आधीच उपस्थित असेल. सिंह राशीत मंगळ आणि केतूची युती होऊन अतिशय विनाशकारी स्फोटक योग निर्माण होणार आहे, जो सुमारे ५२ दिवस राहील. या अशुभ योगामुळे काही राशींना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. आर्थिक अडचणींपासून ते कौटुंबिक जीवनातील अशांततेपर्यंत अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला जाणून घेऊया, या राशी कोणत्या आहेत…
‘या’ राशींचे आर्थिक नुकसान होणार, पुढचे ५२ दिवस संकटाचे?
कन्या
विनाशकारी स्फोटक योगामुळे कन्या राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. मालमत्तेशी संबंधित नुकसान होऊ शकते. व्यवहार आणि गुंतवणुकीबाबत वाद होण्याची शक्यता आहे. नोकरीत आणि करिअरमध्येदेखील अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनेकांसाठी हा काळ तणावपूर्ण असू शकतो. धनहानी आणि कर्ज वाढू शकते. आजार वाढू शकतात. प्रेम संबंधांमध्ये चढ उतार पाहायला मिळू शकतो. तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुमचे शत्रू तुमच्या समस्या वाढवण्याची शक्यता आहे. नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. गैरसमज वाढू शकतात.
मकर
विनाशकारी स्फोटक योगामुळे मकर राशीच्या मंडळींना दुःखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. व्यापाऱ्यांचा व्यवसाय मंदावण्याची शक्यता आहे. या अशुभ योगात नवीन कामाला सुरुवात केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात अनेक चढ-उतार दिसून येऊ शकतात. कुटुंबातील वातावरण तणावपूर्वक असण्याची शक्यता आहे. तसेच, अचानक खर्चात वाढ होऊ शकते. नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची दाट शक्यता आहे, तर अपघातात दुखापत होण्याची भीती आहे. या काळात आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा.
मीन
विनाशकारी स्फोटक योगामुळे मीन राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात वादळ येण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होऊ शकते. भागीदारीच्या कामात मोठे नुकसान होण्याचे संकेत आहेत. आयुष्यात काही तणाव निर्माण होऊ शकतो. या काळात वाहन चालवतानाही विशेष काळजी घ्या. छोट्या-छोट्या कामासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागू शकते. या काळात तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे पैसे खर्च करताना जरा जपूनच करा. कोणत्याही योजनेत अपयश येऊ शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)