Mangal Gochar 2025 Impact in Marathi: ज्योतिषशास्त्रातील नऊ ग्रहांमध्ये मंगळ हा सर्वात प्रभावशाली मानला जातो. भूमी, धैर्य, शौर्य आणि उर्जेचा कारक मंगळ ज्यावेळी मार्ग बदलतो तेव्हा त्याचा मोठा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक वेळी ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. आता भूमिपूत्र मंगळ शनिवार, ७ जून रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाच्या या गोचरामुळे काही राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता असून, त्यांना यावेळी मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या…
मंगळाचे सिंह राशीत संक्रमण! ‘या’ ५ राशींना धनलाभ?
मेष
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाचे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात नशीब तुमच्या बाजूने राहू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडू शकतात. अपूर्ण काम लवकरच पूर्ण होऊ शकतात. कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना चांगला सौदा मिळू शकतो. जीवनसाथीसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो.
मिथुन
मंगळाच्या गोचरामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. पैशाची आवक वाढू शकते. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. सकारात्मक वातावरण निर्माण होईल. कुटुंबातील सर्व समस्या दूर होऊ शकणार आहेत. तुम्हाला अचनाक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना यावेळी वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते.
सिंह
मंगळाच्या गोचरामुळे सिंह राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. या काळात आर्थिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. आर्थिक लाभाचे अंदाज आहेत. मंगळाच्या गोचराच्या प्रभावामुळे तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संधी चालून येऊ शकते. तुम्हाला वडिलोपार्जीत संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.
तूळ
मंगळाचे गोचर तूळ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असू शकते. मंगळ गोचरामुळे या राशीचे नशिब पालटणार आहे. या काळात आर्थिक लाभ आणि तुमच्या कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात मालमत्ता खरेदी किंवा विक्री करू शकता. व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. घरातील वातावण हसतखेळत असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहू शकते.
मीन
मंगळाचे गोचर मीन राशीच्या लोकांसाठी सुख घेऊन येणारे ठरु शकते. आर्थिक लाभ मिळू शकतो. या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते. खूप दिवसांपासून तुम्ही मेहनत करत होता पण आता दिवस बदलणार आहेत. तुमचा चांगला आणि सुखसमृद्धीने भरलेला काळ सुरु होऊ शकतो. तुमचा बँक बॅलेन्स वाढू शकतो. जोडीदारासोबत तुमचे नाते अधिक दृढ होणार आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)