Mangal-Shani Make Tridashank Yog: ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. पंचांगानुसार, १४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजून ५९ मिनिटांनी मंगळ आणि शनी एकमेकांपासून १०८ डिग्री कोणीय स्थितीत असतील, मंगळ-शनीच्या या योगामुळे त्रिदशांक योग निर्माण होईल. शिवाय जोपर्यंत मंगळ ग्रह धनु राशीत आणि शनी मीन राशीत विराजमान आहे, तो हा योग असेल. या योगाच्या शुभ प्रभावाने १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींचे नशीब चमकेल.
मंगळ-शनीचा त्रिदशांक योग करणार मालामाल
वृषभ
या राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंत लाभकारी सिद्ध होईल. तुमच्या मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल.
कन्या
कन्या राशीसाठी हा योग अत्यंत लाभकारी ठरेल. अनेक दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होईल. तुमच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. वैवाहिक जीवन सुखमय राहिल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल.
मकर
मकर राशीसाठी देखील हा योग खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला विशेष लाभ पाहायला मिळेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. घरात सुख, शांती नांदेल. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. आरोग्य चांगले राहिल.
मीन
त्रिदशांक योग मीन राशीच्या व्यक्तींचा बँक बॅलन्स वाढवेल. मंगळ-बुधाच्या युतीमुळे मीन राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
