Mangal Margi 2023: ज्योतिष शास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला विशेष महत्त्व आहे. नवग्रहांमध्ये हा ग्रह चैतन्य आणि ऊर्जा देणारा ग्रह मानला जातो. मान्यतेनुसार मंगळ ग्रह (Mars Planet) परिश्रम, सामर्थ्य आणि धैर्याचे प्रतीक असून तो मेष आणि कन्या राशीचा स्वामी आहे. मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा सर्वच राशींवर प्रभाव पडतो. काहींना या संक्रमणाचा लाभ होतो तर काहींना अडचणींना सामोरे जावे लागते. या १३ जानेवारीला मंगळ देव आपली स्थिती बदलतील, ज्याचा स्थानिकांवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतो. काही लोकांना फायदा होऊ शकतो तर काहींना नुकसानही होऊ शकते.

मंगळ ग्रह हा ग्रहांचा सेनापती म्हणून ओळखला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ वृषभ राशीत मार्गी होणार आहेत. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशीमध्ये फिरतो तेव्हा त्याला मार्गी म्हणतात. मंगळ देवाच्या मार्गी होण्याने कर्क राशीसह दोन राशींसाठी शुभ संकेत आणणारा काळ असणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी.

कर्क राशी

कर्क राशीसाठी मंगळ ग्रहाचे मार्गीक्रमण लाभदायक ठरू शकते. मंगळ कर्क राशीत गोचर करून प्रभाव कक्षेत ११ व्या स्थानी स्थिर होणार आहे. हे स्थान आर्थिक फायद्याचे ठरू शकते. या राशीच्या लोकांवर मंगळ देव मार्गस्थ असल्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. कर्क राशीच्या लोकांना नवीन नोकरीच्या अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे. मंगळाच्या या संक्रमणामुळे तुम्हाला नोकरीत बढती आणि पगारवाढीचाही लाभ मिळू शकतो.

(हे ही वाचा : जानेवारीत सूर्यदेव ‘या’ राशींवर होणार खुश? प्रचंड धनलाभ व नव्या नोकरीने तुमचं नशीबही पालटणार का?)

सिंह राशी

या राशीच्या लोकांसाठी मंगळ हा चौथ्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे. कामाच्या ठिकाणी वेळ अनुकूल राहील, तुम्हाला सहकारी आणि अधिकारी यांचे पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नोकरदारांनाही लाभ मिळू शकतो. रिअल इस्टेटशी संबंधित लोकांनाही सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. आईसोबतच्या नात्यात गोडवा येणार असून या काळात तुम्हाला तिची पूर्ण साथ मिळू शकेल.

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी मंगळ देव तिसऱ्या आणि आठव्या घराचा स्वामी आहे. मंगळ ग्रह आपल्या राशीच्या नवव्या स्थानी विराजमान होणार आहे. हे स्थान भाग्योदयाचे मानले जाते. तुम्हाला परदेशवारीची संधी लाभण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे नातेसंबंध चांगले राहू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे)