Mars Gochar 13 September Zodiac Signs Alert: ग्रहांच्या हालचालींमुळे माणसाच्या जीवनात सुख-दुःखाचे तरंग निर्माण होत असतात. कधी अचानक मिळणारे यश आनंद देऊन जातं, तर कधी अनपेक्षित अडथळे संकटांची दारं उघडतात. अशीच एक महत्त्वाची घटना १३ सप्टेंबरला घडणार आहे. ग्रहांचा सेनानायक मानला जाणारा मंगळ या दिवशी रात्री ९ वाजून २१ मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या बदलामुळे काही राशींना अनपेक्षित उतार-चढावांचा सामना करावा लागणार असल्याचे ज्योतिषतज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः धन, वैवाहिक आयुष्य आणि करिअरच्या क्षेत्रात संकटे डोकावू शकतात. चला पाहू या कोणत्या राशींनी सावध राहणे गरजेचे आहे.

मंगळाच्या चालीनं कोणत्या राशींच्या लोकांसाठी सुरु होणार दुःखाचा काळ?

मेष

मंगळ मेष राशीचा स्वामी असूनही सप्तम भावात त्याचा हा गोचर फारसा अनुकूल ठरणार नाही. या काळात पती-पत्नीमध्ये तणाव आणि त्यामुळे अनावश्यक वादविवाद वाढू शकतात. व्यावसायिक भागीदारीतही अचानक आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या कालावधात अनावश्यक खर्च वाढू शकतो.

कर्क

मंगळाचा प्रवेश कर्क राशीच्या चतुर्थ भावात होणार आहे. त्यामुळे घरगुती खर्च अचानक वाढू शकतात. जमीनजुमल्याशी संबंधित प्रकरणांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते. न्यायालयीन खटले असल्यास सावधगिरी बाळगावी; अन्यथा परिस्थिती गंभीर होऊ शकते. करिअरमध्ये चालणाऱ्या राजकारणापासून लांब राहणेच योग्य ठरेल. धनहानीची शक्यता आहे.

कुंभ

मंगळाचा गोचर कुंभ राशीच्या नवव्या भावात होत असल्याने जास्त प्रमाणात कष्ट करावे लागतील. परंतु, अपेक्षित फळ न मिळाल्यास मनात खंत राहू शकते. करिअरमध्ये अपयश, आर्थिक क्षेत्रात अडचणी आणि पैशाच्या व्यवहारात तोटा होऊ शकतो. विशेष म्हणजे या काळात कोणावरही जास्त विश्वास ठेवणे धोकादायक ठरेल. फसवणुकीची शक्यता वाढेल.

मीन

मंगळाच्या बदलत्या चालीचा परिणाम मीन राशीच्या लोकांसाठी अनिष्ट ठरू शकतो. आरोग्याशी संबंधित समस्या डोके वर काढतील, तसेच खर्चही प्रचंड वाढेल. व्यवसायातही आर्थिक तोट्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

थोडक्यात, १३ सप्टेंबरचा मंगळ गोचर काही राशींसाठी आव्हान घेऊन येणार आहे. योग्य ते उपाय केल्यास अडचणी कमी करता येतील. मात्र, दुर्लक्ष केल्यास परिणाम गंभीर होऊ शकतात. म्हणूनच ज्योतिषतज्ज्ञांचा इशारा सावध राहा आणि योग्य वेळी योग्य पावले उचला.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)