Mars Transit 2023: जानेवारी २०२३ या नवीन वर्षात मंगळाचे संक्रमण होईल, ज्याचा परिणाम सर्व १२ राशींवर दिसून येईल. मंगळ देवाच्या या स्थितीमुळे अनेक राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो आणि अनेकांना नुकसानही होऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगल देव १३ जानेवारी २०२३ रोजी वृषभ राशीत जाणार आहेत आणि ते दोन महिने याच अवस्थेत राहतील. यानंतर मंगळदेव १३ मार्च २०२३ रोजी राशी बदलून मिथुन राशीत प्रवेश करेल. मेष, मिथुन आणि कर्क राशीच्या राशीच्या लोकांवर मंगल देवाच्या संक्रमणाचा काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष राशी (Mars Gochar 2023)

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाच्या मार्गामुळे या राशीच्या लोकांचा काळ प्रतिकूल असू शकतो. यावेळी धनहानी होण्याची शक्यता दिसत आहे तसंच कुटुंबातील सदस्यांशी वादही होऊ शकतात. दुसरीकडे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कोणाशीही बोलत असताना भाषा विचारपूर्वक वापरा कारण यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे.

मिथुन राशी (Mars Gochar 2023)

मंगळ देवाच्या राशी बदलामुळे या राशीच्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कौटुंबिक वाद होऊ शकतो. यावेळी पैसे वापरताना थोडी काळजी घ्या, अन्यथा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसंच या काळात वैवाहिक जीवनातही काही अडचणी येण्याची शक्यता दिसत आहे.

( हे ही वाचा: २०२३ सुरू होताच ‘या’ ३ राशी होणार श्रीमंत? शिवयोग आणि सिद्ध योग घडल्याने मिळू शकतो प्रचंड पैसा)

कर्क राशी (Mars Gochar 2023)

मंगळ देवाच्या मार्गामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणीही वेळ तुमच्यासाठी अनुकूल असू शकते. या काळात सामाजिक प्रतिष्ठाही वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ देखील होऊ शकतात आणि आपण आपले ध्येय देखील साध्य करू शकता.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mars transit in 13 january 2023 know what will be the effect on aries gemini and cancer zodiac signs gps
First published on: 27-12-2022 at 12:18 IST