Mauni Amavasya 2025 : प्रत्येक वर्षी माघ महिन्यात अमावस्या तिथीवर मौनी अमावस्या साजरी केली जाते. या वर्षी पहिली अमावस्या २९ जानेवारी रोजी आहे. प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान करणे शुभ मानले जाते. या अमावस्येला माघी अमावस्या देखील म्हणतात. यावेळी मौनी अमावस्येच्या दिवशी अत्यंत शुभ योग निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मौनी अमावस्येच्या दिवशी शनि देव मकर राशीमध्ये त्रिवेणी योग निर्माण होत आहे. माघी अमावस्येच्या दिवशी मकर राशीमध्ये सूर्य, चंद्र आणि बुध ग्रहाचा योग निर्माण होत आहे ज्याला त्रिवेणी योग निर्माण होत आहे.

या दरम्यान देव गुरू नवव्या दृष्टीवरून तीन ग्रहांना बघणार ज्यामुळे नवपंचम योग निर्माण होणार. मौनी अमावस्येच्या दिवशी निर्माण होणाऱ्या त्रिवेणी योग काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊ या त्या कोणत्या राशी कोणत्या आहेत.

वृषभ राशी

मौनी अमावस्येच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्य स्थानी म्हणजेच नवव्या भावात त्रिवेणी किंवा त्रिग्रही योग निर्माण होत आहे. याच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांना अध्यात्माकडे वळतील. या दरम्यान हे लोक धार्मिक यात्रा करू शकतात. पितृ संपत्तीपासून या लोकांना लाभ मिळू शकतो. जे लोक नोकरी करतात त्यांच्यासाठी हा काळ उत्तम राहीन. कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रोजेक्टमधून खूप यश मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात संबंधामध्ये मधुरता दिसून येईल. आनंदाची बातमी मिळू शकते.

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांना विवाह स्थानी सप्तम भावात त्रिवेणी योग निर्माण होणार आहे. या योगच्या शुभ प्रभावाने वैवाहिक जीवनात प्रेम आणि समजूतदारपणा दिसून येईल. कर्क राशीच्या लोकांचा धार्मिक कार्यामध्ये सहभाग वाढेन. घर कुटुंबामध्ये मांगलिक कार्यामध्ये संयोग निर्माण होईल. त्रिवेणी योगानुसार जे लोक यात्रा करतील त्यांना लाभ मिळू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी त्रिवेणी योग मकर राशीमधये निर्माण होणार आहे. अशात हा योग मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो. या दरम्यान या लोकांन सर्व काही मिळेल ज्यासाठी ते दीर्घकाळ वाट पाहत आहे. या राशीच्या जीवनात भौतिक सुख संपत्तीमध्ये वृद्धी होईल. समाजात या लोकांची प्रतिष्ठा वाढेन. जीवनात या लोकांना एक सकारात्मक बदल दिसून येईल. व्यवसायात या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)