Budh Planet Margi 2025: ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, व्यापार आणि संवादाचा कारक मानलं जातं. याच बुध ग्रहाची चाल ज्या वेळी बदलते, त्या वेळी संपूर्ण सृष्टीवर आणि सर्व राशींवर त्याचा खोल परिणाम दिसून येतो. ज्योतिषशास्त्रात वक्री, मार्गी, स्तंभी आणि अस्तंगत या ग्रहांच्या स्थिती महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण त्याचा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम सर्व राशींवर होत असतो. आता येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात बुध ग्रह कर्क राशीतून ‘मार्गी’ म्हणजेच सरळ चालेल. पण यावेळी विशेष लक्ष वेधून घेत आहेत फक्त ३ राशी ज्या सध्या सुखद परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहेत. हे नुसतं ग्रह चालत आहेत एवढंच नाही, तर या राशींच्या नशिबात अचानक मिळणारा धनलाभ, करिअरमध्ये झपाट्याने प्रगती आणि नात्यांमध्ये सकारात्मक वळण हे सर्व काही दिसून येणार आहे. जाणून घेऊयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
ऑगस्टमध्ये बुध चालतील सरळ आणि ‘या’ राशींना मिळणार जबरदस्त फायदा!
वृश्चिक (Scorpio)
बुध ग्रह मार्गी होताच, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ही संधी सोन्यासारखी ठरणार आहे. भाग्योदयाचे दार खुलणार आहे, प्रवासाचे आणि धार्मिक कार्यांचे योग घडून येऊ शकतात. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकते. प्रमोशन होण्याची शक्यता आहे. व्यवसायात भागीदारीतून मोठा फायदा होऊ शकतो शेअर बाजार, सट्टेबाजी किंवा लॉटरीमध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे. आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश प्राप्त होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल.
तूळ (Libra)
तूळ राशीच्या व्यक्तींना या काळात करिअर व व्यवसायात विशेष लाभ मिळू शकतो. बुध ग्रह कर्म स्थानात मार्गी होत असल्यामुळे, बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. आधीपासून नोकरीत असलेल्या व्यक्तींना प्रमोशन वा पगारवाढीचा आनंद मिळू शकतो. शिक्षण, मीडिया आणि लेखनाशी संबंधित लोकांना अप्रतिम यश मिळू शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला भौतिक सुख सुविधा मिळू शकतात.
मिथुन (Gemini)
मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधदेवाच्या कृपेने या काळात मोठा लाभ मिळू शकतो. बुध ग्रह धनभावात मार्गी होत असल्यामुळे, फसलेली गुंतवणूक परत मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग तुम्हाला गवसणार आहे. अचानक तुम्हाला पैसे मिळू शकतात. परदेशात जाण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. विवाहितांना जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. वाहन किंवा घरखरेदीचे योग आहेत.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)