Bhadra Rajyog 2024: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह विशिष्ट कालावधीत उदय होतात आणि अस्त होता, ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. ऑक्टोबरमध्ये बुध उदय होणार आहे. अशा स्थितीत भद्र राजयोग तयार होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. परंतु अशा ३ राशी आहेत ज्यांच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत.

कन्या राशी (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी भद्र राजयोग लाभदायी ठरू शकतो. कारण बुध ग्रह तुम्हाला तुमच्या राशीच्या लग्न घरामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. तसेच या काळात तुमच्या कामात सुधारेल. त्याच वेळी, या काळात तुम्ही जी काही गुंतवणूक कराल ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला मोठ्या आर्थिक लाभाची चांगली रक्कम मिळेल. या काळात तुमचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. तसेच, अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.

हेही वाचा – RBI चे नवे फीचर! आता डेबिट कार्डशिवायही एटीएममध्ये जमा करा पैसे; कसे वापरावे घ्या जाणून

मकर राशी (Capricorn)

भद्र राजयोग निर्माण झाल्याने मकर राशीचे लोकांसाठी चांगले दिवस सुरु होऊ शकतात. कारण बुध ग्रह आपल्या गोचर कुंडलीमध्ये नवव्या घरामध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे या काळात या राशीच्या लोकांचा भाग्योदय होऊ शकतो. तसेच या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. तसेच कामाच्या ठिकाणी सर्वा कामात तुम्हाला यश मिळू शकते. तुमच्या आयुष्यात भरपूर आनंद मिळेल. या कालात तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली राहणार आहे. तसेच या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात कार्यक्रमात सहभागी होऊ शकते. तसेच तुम्ही आत्मविश्वासाच्या जोरावर खूप काही साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता.

Mercury rises in October Bhadra Raja Yoga
बुध ग्रहाचा उदय झाल्याने भद्र राजयोग निर्माण होत आहे (सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

हेही वाचा – RBI चे नवे फीचर! आता डेबिट कार्डशिवायही एटीएममध्ये जमा करा पैसे; कसे वापरावे घ्या जाणू

वृषभ राशी (Taurus)

भद्र राजयोगामुळे या राशीसाठी अत्यंत लाभदायी ठरू शकतो. कारण बुध ग्रह तुमच्या गोचर कुंडलीमध्ये पाचव्या स्थानावर गोचर करत आहे त्यामुळे या काळात पालकांना त्यांच्या मुलांसंबंधी काहीतरी चांगली बातमी मिळू शकते. मालमत्ता आणि घर संबंधित वाहन खरेदी देखील करू शकता. कार्य क्षेत्रात तुम्हाला भरपूर यश मिळेल. तुम्ही या काळात प्रसन्न आणि संतुष्ट रहाल आहे. तसेच या काळात नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तुमच्या पगारात वाढ होऊ शकते. तसेच तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. पैशांची बचत करण्यातही तुम्हाला यश मिळेल.