Budhaditya Yog 2025: वैदिक ज्योतिष शास्त्रात ग्रहांची विशेष भूमिका आहे. सर्व ग्रह नियमित अंतराने त्यांची चिन्हे बदलतात. ग्रहांच्या राशीच्या बदलाव्यतिरिक्त, सर्व ग्रहांच्या चाली वेळोवेळी बदलत राहतात, ज्याचा प्रत्त्येकाच्या जीवनावर परिणाम होतो. यावेळी सूर्यदेव मेष राशीत विराजमान आहेत, तर आता ७ मे रोजी पहाटे ४.१३ वाजता बुध ग्रह मेष राशीत प्रवेश करेल. यातच मेष राशीत सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने ‘बुधादित्य राजयोग’ घडून येणार आहे. हा शुभ योग १२ वर्षांनी मेष राशीत घडून येतोय. बुधादित्य राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हाही राशींमध्ये बुधादित्य राजयोग तयार होतो तेव्हा लोकांचे भाग्य खुलते, असं मानले जाते. या राजयोगाचा काही राशींना फायदा होऊ शकतो. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींचं नशीब पालटणार?
तूळ
बुधादित्य राजयोग तूळ राशीच्या लोकांसाठी फार शुभ आणि लाभदायक ठरू शकतो. या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या लोकांच्या सुख-सुविधांमध्येही वाढ होऊ शकते. तुम्हाला व्यवसायात या काळात उत्तम यश मिळू शकते. नोकरदार लोकांसाठी पदोन्नती आणि वेतनवाढीची शक्यता आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील. तुमच्या जोडीदाराचीही प्रगती होऊ शकते. तसेच यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात.
मकर
बुधादित्य राजयोग मकर राशीच्या लोकांसाठी फार चांगला ठरू शकतो. यावेळी नशीब तुमच्या बाजूने असू शकते. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत दिसत आहेत. या काळात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकतं. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. यावेळी पैशाच्या आवकासाठी नवीन मार्ग तयार होऊ शकतात. तसंच तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तुम्हाला तुमच्या कामात प्रसिद्धी मिळू शकते.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग शुभ ठरू शकतो. जे नोकरी शोधत आहेत, त्यांना नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. तुम्हाला सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काही विशेष संधी मिळू शकते. या काळात तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. यावेळी तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्तेचा सौदा करू शकता. यावेळी तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे, लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)