वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळो मार्गी आणि वक्री होतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देशासह जगावर दिसून येतो. काही दिवसांपूर्वी बुद्धी आणि व्यवसायाचा दाता बुध ग्रह वक्री झाला होता आणि तो आता सप्टेंबरमध्ये मार्गी होणार आहे, ज्याचा प्रभाव सर्व राशींच्या राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. पण अशा ३ राशी आहेत, ज्यांना या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तर या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत जाणून घेऊया.

धनु रास (Dhanu Zodiac)

बुध ग्रह मार्गी होणं धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण बुध ग्रह तुमच्या राशीतून थेट नवव्या स्थानी जाणार आहे. त्यामुळे या काळात तुम्ही भाग्यवान ठरु शकता. तसेच, बुध ग्रह तुमच्या राशीच्या सातव्या आणि दहाव्या स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे विवाहितांना त्यांच्या जीवनसाथीची चांगली साथ मिळू शकते. तसेच नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकतात. तर व्यावसायिकांचा या काळात चांगला नफा होऊ शकतो.

वृषभ रास (Taurus Zodiac)

वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधाचे सिंह राशीत मार्गी होणं शुभ आणि फलदायी ठरू शकते. कारण बुध ग्रह तुमच्या राशीतून थेट चौथ्या स्थानी जाणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला सर्व भौतिक सुखे मिळू शकतात. तसेच, या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. दुसरीकडे, बुध हा ग्रह तुमच्या राशीच्या दुसऱ्या आणि पाचव्या स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. तर मुलाकडून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- सप्टेंबर महिन्यात ५ ग्रहांच्या चालीत मोठे बदल होताच ‘या’ राशींचे नशीब पालटणार? बक्कळ धनलाभासह व्यवसायात प्रगतीची शक्यता

कर्क रास (Cancer Zodiac)

बुध ग्रहाचे मार्गी होणे तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. कारण तुमच्या गोचर कुंडलीत धनाच्या स्थानाचा स्वामी बुध आहे. त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. या काळात तुम्ही मोठमोठ्या लोकांशी मैत्री करु शकता. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. दुसरीकडे, बुध ग्रह तुमच्या राशीच्या तिसऱ्या आणि बाराव्या घराचा स्वामी असल्यामुळे तुम्ही बचत करण्यात यशस्वी होऊ शकता.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)