Budh Margi in Cancer 2025: १ ऑगस्ट रोजी बुध ग्रह कर्क राशीत मार्गी होत आहे आणि त्याचा परिणाम १२ राशींवरही होणार आहे. बुध ग्रहाला व्यवसाय, संवाद, बुद्धिमत्ता व तार्किक विचारांचे कारक मानले जाते. या ग्रहाच्या मार्गी होण्यामुळे काही राशींच्या लोकांना अप्रतिम सकारात्मक परिणामांचा अनुभव येणार आहे. विशेषतः ४ राशींच्या लोकांसाठी हा बदल खूप शुभ ठरणार आहे. या बदलामुळे कोणती राशी अचानक श्रीमंत होईल? कोणाला करिअरमध्ये मिळणार मोठी संधी? कोणाला मिळणार संतानसुख आणि कौटुंबिक आनंद? जाणून घ्या तुमची राशी या यादीत आहे का…
‘या’ राशी ठरणार नशीबवान! ४ दिवसांनी आयुष्य पालटणार?
मिथुन (Gemini)
बुध ग्रह आपल्या राशीच्या दुसऱ्या भावात मार्गी होत आहेत. विशेष बाब म्हणजे बुध हा या राशीचा स्वामीही आहे. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना वाणीचा प्रभाव, लोकांवर छाप टाकण्याची क्षमता मिळेल. पैतृक संपत्तीपासून लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौहार्दता वाढेल आणि काही लोक कुटुंबासोबत प्रवासालाही जाऊ शकतील. विशेषतः महिलांना करिअरमध्ये मोठी संधी मिळेल.
कन्या (Virgo)
बुध कन्या राशीच्या ११व्या लाभ भावात मार्गस्थ होत आहे. हा भाव लाभ, प्राप्ती व प्रगतीसाठी उपयुक्त असतो. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांना नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि कौटुंबिक जीवनात चांगले दिवस दिसू लागतील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष फलदायी ठरेल.
तूळ (Libra)
बुध ग्रहाचा मार्गी प्रभाव कर्म भावावर होणार आहे, ज्याचा थेट संबंध करिअरशी असतो. त्यामुळे तूळ राशीतील लोकांना नवीन जॉबची संधी, प्रमोशन मिळेल किंवा त्यांची नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. सहकर्मचाऱ्यांमध्ये तुमचा प्रभाव वाढेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे.
मीन (Pisces)
बुध ग्रह तुमच्या सृजनशील पाचव्या भावात मार्गी होत आहे. त्यामुळे मीन राशीच्या लोकांना कला, मिडिया, फिल्म क्षेत्रात यश मिळू शकते. संततीकडून एखादी आनंददायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध गोड होतील आणि घरातील लोकही तुमचं कौतुक करतील. काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
एकूणच या चार राशींसाठी बुध ग्रहाचं मार्गी होणं म्हणजे सोन्याची संधी! हा काळ तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतो. त्यामुळे या दिवसांचा योग्य तो वापर करा आणि पुढील प्रवासासाठी सज्ज व्हा.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)