Surya & Guru Yuti : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करत असतो. याचा प्रभाव कमी अधिक तसेच शुभ- अशुभ स्वरूपात समस्त मानवी जीवनावर दिसून येत असतो. जेव्हा काही ग्रह एकाच राशीत एकाच रांगेत येतात तेव्हा त्यातून काही राजयोग सुद्धा तयार होतात. तर कॅलेंडरनुसार, १७ नोव्हेंबर रोजी सूर्य आणि गुरु एकमेकांपासून १२०° च्या कोनात असतील. ग्रहांचा राजा ‘सूर्य’ आणि देवांचा गुरु ‘गुरु’ यांच्यातील या स्थितीला ज्योतिषशास्त्रात ‘नवपंचम राजयोग’ असे म्हणतात आणि ते अत्यंत शुभ देखील मानले जाते. त्यामुळे या राजयोगामुळे काही राशींचे भाग्य चमकू शकते. शिवाय, या राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ आणि भाग्य लाभण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते…

मकर – नवपंचम राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या कामात, व्यवसायात प्रगती मिळू शकते. जर तुम्ही व्यवसायात किंवा नोकरी करत असाल तर जबाबदाऱ्या वाढण्याची किंवा पदोन्नती होण्याची शक्यता आहे. तुमच्या कठोर परिश्रमाचे थेट परिणाम तुम्हाला दिसून येतील. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार देखील करू शकता. या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढीस लागेल आणि तुम्ही ठरवलेल्या योजना यशस्वी सुद्धा होतील.

धनु – नवपंचम राजयोगाच्या निर्मितीसह, धनु राशीच्या लोकांना सकारात्मक काळ सुरु होऊ शकतो. या काळात तुमचे उत्पन्न वाढेल, उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील. तुम्ही अचानक तुमच्या करिअर, व्यवसायाची एखादी जबाबदारी स्वीकारू शकता; ज्यामुळे तुम्हाला नेतृत्वाची भूमिका मिळू शकते. तुमचे सामाजिक व्यक्तिमत्व उठून दिसेल आणि मागील प्रयत्नांना फळ सुद्धा मिळेल. या काळात तुम्ही देशात किंवा परदेशात देखील प्रवास करू शकता. या काळात व्यावसायिकांना लक्षणीय नफा मिळू शकतो आणि तुम्हाला आदर देखील मिळू शकतो.

कर्क – नवपंचम राजयोग तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. या काळात तुम्हाला संपत्ती आणि मालमत्ता मिळू शकते. नवीन प्रकल्प किंवा व्यवसायातही फायदा होईल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमची बुद्धिमत्ता आणि विवेकबुद्धी तुम्हाला योग्य वेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करेल. या काळात बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळू शकते, तर नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पगारवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. तुमच्या पालकांशीही तुमचे संबंध चांगले राहतील.