Surya transit in libra: हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला शारदीय नवरात्रीला सुरूवात होईल. यंदा शारदीय नवरात्री ३ ऑक्टोबरपासून ते ११ ऑक्टोबरपर्यंत असेल. ज्योतिषशास्त्रानुसारही नवरात्रीचा हा काळ खूप खास मानला जातो. हा काळ अनेकांच्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येणारा असतो. तसेच सूर्य नवरात्रीनंतर १७ ऑक्टोबर रोजी शुक्राच्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचे हे तूळ राशीतील राशी परिवर्तन काही राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

सूर्य या तीन राशींना देणार यश

मेष

सूर्याच्या तूळ राशीतील प्रवेशाने मेष राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील, त्यामुळे या काळात तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळेल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबाची आर्थिक परस्थिती अधिक मजबूत होईल. आयुष्यात आनंदी आनंद असेल.

कर्क

सूर्याच्या तूळ राशीतील प्रवेशाने कर्क राशीच्या व्यक्तींनाही सुख-समाधान प्राप्त होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. आईबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल.

हेही वाचा: आकस्मिक धनलाभ होणार; तूळ राशीतील प्रवेशाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद

धनु

धनु राशीच्या व्यक्तींनाही सूर्याच्या राशी परिवर्तनाचा चांगला फायदा होईल. या काळात भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. कामाच्या निमित्ताने दूरचे प्रवास करावे लागतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)