Neptune Planet Grah Vakri 2025: ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रहांचे वर्णन केले जाते, ज्यात वरूण (नेपच्यून) या ग्रहाचा समावेश नाही. परंतु पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात वरूण ग्रहाला महत्त्वपूर्ण मानले जाते. या ग्रहाचा संबंध कल्पना, भ्रम आणि रहस्य या गोष्टींशी आहे त्यामुळे या ग्रहाच्या प्रभावाने व्यक्तीच्या मनामध्ये नव्या विचारांचा जन्म होतो. तसेच ज्या व्यक्तींवर वरूण ग्रहाची विशेष कृपा असते अशा लोकांना आयुष्यात मोठ्या गोष्टी करण्याची प्रेरणा मिळते. परंतु जेव्हा वरूण ग्रहाची अशुभ दृष्टी एखाद्यावर पडते तेव्हा अशी व्यक्ती मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असते. दरम्यान, पंचांगानुसार ५ जुलै २०२५ रोजी वरूण ग्रह वक्री झाला होता जो १० डिसेंबर २०२५ पर्यंत या अवस्थेत राहणार आहे, त्यानंतर तो मार्गी होईल. दरम्यान, वरूण ग्रहाला वक्रीवरून मार्गी अवस्थेत जाण्यासाठी अजून ९२ दिवस वाट पाहावी लागले. म्हणजे पुढील ९२ दिवस काही राशींच्या व्यक्तींवर वरूण देव मेहरबान राहणार आहे.

‘या’ तीन राशींवर वरूण ग्रहाची विशेष कृपा

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या व्यक्तींवर वरूणाची विशेष कृपा असणार आहे. या काळात तुमच्या नशीबाची साथ मिळेल. नव्या कल्पनाशक्ती जागृत होतील. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल.

वृश्चिक (Vruschik Rashi)

यार राशीच्या व्यक्तीवरदेखील वरूणाची कृपा होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

मीन (Meen Rashi)

मीन राशीच्या व्यक्तींवरही वरूण ग्रह प्रसन्न असेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना खूप यश मिळेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)