Shatruhanta Yog Rashibhavishya: ज्योतिषशास्त्रात शत्रुहंता योग हा एक अतिशय शक्तिशाली योग मानला गेला आहे. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत योग आहे त्याला कोणीही हरवू शकत नाही. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाची कुंडली मध्येही हा योग निर्माण झाला होता. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सूर्य आणि मंगळ वृश्चिक राशीत हा योग निर्माण करत आहेत. या योगामुळे तिन्ही राशींच्या लोकांची शक्ती वाढेल आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. या योगाचा कोणत्या राशींना सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे ते जाणून घ्या.
सिंह राशी (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी हा योग फायदेशीर ठरेल. तुमच्या करिअर आणि व्यवसायात यश तुमची वाट पाहत आहे. तुमचे विरोधक तुमच्या कामात कितीही अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असले तरी तुम्ही यशस्वी व्हाल. कायदेशीर बाबींमध्येही विजय मिळण्याची दाट शक्यता आहे. मालमत्तेचे कोणतेही वाद मिटतील.
वृश्चिक राशी (Scoroip Horosocpe)
हा योग वृश्चिक राशीत तयार होतो, त्यामुळे या राशीच्या लोकांना या योगाचा सर्वाधिक फायदा होईल. तुमचे शत्रू कमकूवत पडतील ज्यामुळे तुमचा विजय पक्का आहे. या काळात तुमच्या शत्रूंचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि तुम्हाला अचानक तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ दिसून येईल.
मकर राशी (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी हा योग विजयाचे वरदान घेऊन आला आहे. तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत प्रगती करण्याच्या संधी मिळतील. विरोधकांपासून तुमची सुटका होईल. या काळात तुम्हाला प्रभावशाली लोकांचे सहकार्य मिळेल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळेल. या काळात शत्रू तुमच्या कामात अडथळा आणू शकणार नाहीत.
टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे
